![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आयुष्याच्या गणीताचा, हिशोब तयार आहे,
गणीतात उरले न काही, फक्त हातच्याचाच आधार आहे.......
प्रत्येक गोष्टीचा येथे, केला करार आहे,
वाटते इथे जसे, आयुष्य जुगार आहे........
रोख चोख नाही काही इथे, हिशोब उधार आहे,
हिशोब ज्यांच्याकडे आता तेही फकार आहे .......
जुळवत जातो जुळवत गेलो परी, पडली दरार आहे,
खाईत दरारीच्या, पसरला अंधार आहे .......
हिशोब विसरती सगळे, असे मुजोर आहे,
चोरी करूनी इथे, चोरही शिरजोर आहे.........
अशा या आयुष्याचा, हिशोब भंगार आहे,
हिशोब करून डाग पुसणारा , मी रंगार आहे ......
असे असले तरी माञ, जगणे स्विकार आहे,
मरण्यास माञ अमुचा, स्पष्ट नकार आहे .....
श्रीकांत धोटे
प्रकाशन दिनांक | शीर्षक |
---|---|
07 - 04 - 2025 | कविता म्हणजे काय? |
06 - 04 - 2025 | कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी |
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.