नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
**********
*******
**********
१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Times।मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
*******
०१ जुलै २०१७ची पोस्ट
*******
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
प्रतिक्रिया
अरे वा! तयारी सुरु झाली तर...
अरे वा! तयारी सुरु झाली तर...
पुण्यात किंवा नासिकला घेणार असाल तर मी मदतीला आहे.
मुंबईला झाले तरी
मुंबईला झाले तरी तुमची मदत अपेक्षित आहेच.
शेतकरी तितुका एक एक!
नक्कीच सर __/\__
नक्कीच सर __/\__
(स्माईलींचा काय लोचा झालाय कळेना )
मागचे संमेलन चुकल्याने खूप वाईट वाटतेय. लवकर लेखनस्पर्धा जाहिर करा. लेखणी शिवशिवत आहे.
स्माईलींचा लोचा
स्माईलींचा लोचा... बघतो. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
स्माईलींचा लोचा
स्माईलींचा लोचा आता सुटला आहे. तुम्हीं स्माईलींचा वापर करून ट्रायल घ्यावी.
लोचा
लोचा आता दूर झाला आहे.
तुमच्या पोस्ट मध्ये स्मायली दिसायला लागल्यात.
शेतकरी तितुका एक एक!
साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी
साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी
नमस्कार मंडळी,
४ थ्या अ. भा मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची घोषणा पुढील आठवड्यात करण्याचे नियोजित आहे. यापूर्वी आपण ३ साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करून पार पाडलीत पण शेतकरी साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी करणे अत्यंत आवश्यक असूनही तसे शक्य झाले नव्हते. शेतकरी साहित्य चळवळीचे अवघड धनुष्य कोण पेलू शकेल याविषयी तेव्हा धूसर असलेले चित्र आता सुस्पष्ट व्हायला लागल्याने बांधणीचे कार्य सुरु करणे आवश्यक झालेले आहे.
पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ आणि विभागीय संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर तातडीने संपर्क साधावा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!
स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी तितुका एक एक!
चालू घडामोडीची माहिती
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या चालू घडामोडीची माहिती मिळत राहण्यासाठी :
१) युगात्मा परिवार मोबाईल अॅप https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app6... या लिंकवरून डाऊनलोड करा.
२) http://www.baliraja.com/ssc येथे नियमित भेट द्या.
३) https://www.facebook.com/groups/abmssc/ या फेसबुक ग्रुपचे सदस्य व्हा.
शेतकरी तितुका एक एक!
देशोन्नती अकोला
शेतकरी तितुका एक एक!
लोकमत मुंबई
शेतकरी तितुका एक एक!
दिव्यमराठी मुंबई
शेतकरी तितुका एक एक!
लोकशाही वार्ता
शेतकरी तितुका एक एक!
पुढारी मुंबई
शेतकरी तितुका एक एक!
सामना मुंबई
शेतकरी तितुका एक एक!
महाव्हॉईस मुंबई
शेतकरी तितुका एक एक!
MPSC Mumbai
शेतकरी तितुका एक एक!
कार्यक्रमाची रुपरेषा
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
कार्यक्रमाची रुपरेषा
सत्र - १ : सकाळी ०९.३० ते १२.०० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्घाटन आणि स्वागतसमारोह
सत्र - २ : दुपारी १२.०० ते ०१.३० : शेतकरी कवी संमेलन
सत्र - ३ : दुपारी ०२.३० ते ०४.०० : परिसंवाद - १
विषय : आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण
सत्र - ४ : दुपारी ०४.०० ते ०४.५० : परिसंवाद - २
विषय - स्वामिनाथन आयोग : शेतीला तारक की मारक?
सत्र - ५ : सायं ०५.०० ते ०६.३० : शेतकरी गझल मुशायरा
सत्र - ६ : सायं ०६.३० ते ०८.०० : परिसंवाद - ३
विषय - शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल
सत्र - ७ : रात्री ०८.०० ते १०.०० : समारोपीय सत्र आणि पुरस्कार वितरण
विषय - सावध! ऐका पुढल्या हाका
बळीराजाच्या आरतीने समारोप
शेतकरी तितुका एक एक!
कार्यक्रमाची रुपरेषा
योग्य नियोजन
१ दिवशीय असल्यामुळे
प्रत्येक सत्र वेळेतच पार पडेल
याची सर्व आपण मिळून दक्षता घेऊ
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
अनेक शुभेच्छा सर नक्की येणार.
अनेक शुभेच्छा सर
नक्की येणार.
अभिनंदन सर
नक्की येत आहे.
Dr. Ravipal Bharshankar
हो सर,
सर्व काही वेळेत पार पडेल ह्याची नक्कीच आपण दक्षता घेऊ.
Dr. Ravipal Bharshankar
अभिनंदन
अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा सर.
संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा!
खुप छान नियोजन
स्थळसुध्दा
४ थे अ.भा.मराठी शेतकरी
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
निवेदन
आपली प्रतिनिधी नोंदणी आणि कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात. आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात. अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ४ थ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे. आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
शेतकरी तितुका एक एक!
कवी गझल नोंदणी
कवी गझल नोंदणी
नोंदणी करताना आपले नाव मराठी मध्ये लिहावे, अशी सूचना असूनही अनेकांनी इंग्लिश मध्येच लिहिले आहे. कार्यक्रम पत्रिकेत सदर नावे मराठीत लिहिताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वीकारू शकत नाही.
कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
कवी - गझलकार निवड
कवी - गझलकार निवड
कवी - गझलकार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून ज्यांची निवड झाली त्यांना आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांनाही उद्या सायंकाळ ६ वाजेपर्यंत whatsapp किंवा SMS किंवा Email यापैकी कोणत्याही एका संदेशप्रणालीद्वारे संदेश रवाना होईल.
ज्यांना कोणताच संदेश प्राप्त होणार नाही त्या कवी - गझलकार मित्रांनी उद्या रात्री तातडीने मला whatsapp किंवा SMS किंवा Email यापैकी कोणत्याही एका संदेशप्रणालीद्वारे संपर्क करावा.
शेतकरी तितुका एक एक!
निरोप आला आहे. धन्यवाद __/\_
निरोप आला आहे. धन्यवाद __/\__
अत्यंत महत्वाचे निवेदन
अत्यंत महत्वाचे निवेदन
पूर्वानुभव असा आहे कि, अनेक सहभागी कवी/गझलकार/स्पर्धा विजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे उद्या दि. १३/०१/२०१८ ला सायंकाळ पर्यंत ज्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परत एकदा विनंती कि ज्यांनी अजूनही चुकूनभुलून प्रतिनिधी नोंदणी केली नसेल त्यांनी आपली प्रतिनिधी नोंदणी उद्या दि. १३/०१/२०१८ ला सायंकाळ पर्यंत करावी आणि आम्हास सहकार्य करावे, ही अत्यंत आग्रहाची विनंती.
- गंगाधर मुटे
(वेळेवरच्या सहभागींना सन्मानचिन्ह (momento) देता येणार नाही. अशा विचित्र स्थितीत मानापानाची नाटके रंगू नयेत म्हणून ही पूर्वसूचना व विनंतीसह जाहीर खुलासा)
प्रतिनिधी नोंदणी यादी
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप