नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

ढाल

RANGNATH TALWATKAR's picture
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

ढाल

मूग गेले उडीद गेले कपाशीची बोंब
अतिवृष्टीपायी फुटले सोयाबीनले कोंब

तरी म्हणे शेतकऱ्या तू हार नको मानू
राजकारण्यांवर असा आळ नको आणू

हातात येईन त्याले बी भाव नाही बरा
अकराचे पाच झाले दुष्मन कोण खरा

मागल्या वर्षी सोयाबीन गेले धीर द्याले आले
अकराहून पाच झाले तुम्ही काय केले

रानातल्या पावसाची बनेल नक्कीच ढाल
एक दिवस योग्य दरात विकेल आमचा माल

- रंगनाथ तालवटकर

Share

Comments

Layout Settings