पहाटे पहाटे तुला जाग आली
विनोदी कविता ॥२५॥
पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!
तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी ...!!
म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!
जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!
तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली ...!!
- गंगाधर मुटे 'अभय'
(विडंबन-कविश्रेष्ठ सुरेश भटांचा क्षमाप्रार्थी)
=÷=÷=÷=÷=
अकरा/सहा/दोन हजार नऊ
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
प्रतिक्रिया
मस्त !जयंत
मस्त !
जयंत कुलकर्णी.
http://www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
हे हे हे..मस्त
हे हे हे..मस्त
जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी,ऑलाउट कशाला ?
फुकटात सारी, मच्छरे पळाली …!!
खूपच छान. कविता वाचल्यावर
खूपच छान. कविता वाचल्यावर मनातील मच्छर, उंदीर सर्वच पळून गेले
हा हा हा हा....मज्जा आली
हा हा हा हा....
मज्जा आली वाचताना. खूप मजेदार. आवडली.
kavita vachun zopach udali...
kavita vachun zopach udali...
पहाटे पहाटे तुला जाग आली
खूप सुंदर विडंबन
प्रचंड आवडलंय
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2175198649171478
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0B87GrMJ4ogCQ4PgnFXovM...
पाने