नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शरदराव जोशी तुम्हीच ...
तुम्हीच नेला शिवारातुनी दिल्लीपर्यंत नांगर
तुमच्या आवाजात मातीची व्यथा बोलले वावर
तुम्हीच शिकविले सा-या शेतक-याला लढायला
लढलो म्हणूनच खरं तर शिकलो जगायला
तुम्हीच दिला बळीच्या हातात झेंडा नव्या क्रांतीचा
तुम्हीच बुलंद केला आवाज वावराच्या मातीचा
तुम्ही नेतृत्व केल्याने कोयत्याची तलवार झाली
दिल्ली मुंबईची तेव्हा कुठे सरकार जागी झाली
जेव्हा जेव्हा केले व्यवस्थेने बळीराजाचे शोषन
तुम्हीच केले फक्त बळीच्या हक्कांसाठी उपोषन
तुम्ही होता म्हणून हमीभावासाठी झटता आले
तुम्ही होता म्हणून बळीच्या श्रमाला मोल मिळाले
तुमच्या आंदोलनाने जेव्हा रस्ते रस्ते जाम झाले
देश कृषीप्रधान हा सरकारच्या ध्यानात आले
तुमच्या लेखनीत बळीच्या अश्रूंचा गंध असतो
तुमचा प्रत्येक शब्द बळीराजासाठीच झटतो
शरदराव जोशी म्हणजे क्रांतीचे एक वादळ
शरदराव जोशी म्हणजे शेतकरी चळवळ
. . . निलेश कवडे
प्रतिक्रिया
अभिनंदन
सुंदर
सुंदर