Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***लेखनस्पर्धा प्रवेशिकांतील उणिवा आणि तृटी

लेखनस्पर्धा प्रवेशिकांतील उणिवा आणि तृटी
 
नमस्कार सहकारी मित्रमैत्रिणींनो,
      नुकतीच आपली विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० संपन्न झाली पण त्यात सादर करण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये खूप उणिवा व तृटी असल्याने अनेक प्रवेशिका स्पर्धेतून बाद ठरण्याची शक्यता असल्याने त्या तृटी दूर करण्यासाठी संबंधितांना संधी मिळावी म्हणून हा धागा आहे.
 
    अनेकांना संकेतस्थळावर वावरण्याचा अनुभव नसल्याने बऱ्याच चुका झाल्या आहेत. अगदी नवशिक्याला किंवा इंटरनेट वापराचे जुजबी ज्ञान असणारांनाही सुलभतेने संकेतस्थळाचा वापर करता यावा, यासाठी संकेतस्थळ सहज - सुलभ ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण तरीही चुका होतातच.
 
     बळीराजा डॉट कॉमची निर्मिती २०११ मध्ये करण्यात आली तेव्हा कॉम्युटर, लॅपटॉप, डेस्कटॉपचा मुख्यत्वे वापर होता पण कालांतराने टॅब आणि मोबाईलचा वापर वाढल्याने संकेतस्थळ "मोबाईल फ्रेंडली" करण्यात आले पण त्यात अनेक तृटी कायम होत्या. माझ्याकडे किंवा माझ्या मित्रविश्वात किंवा माझ्या परिचयात कोणीच इंटरनेट संकेतस्थळ तज्ज्ञ निर्माता नसल्याने संकेतस्थळाच्या जडणघडणीत व अद्ययातनात खूप तांत्रिक समस्या उद्भवायच्या.  सरतेशेवटी बाकी सर्व कामे बाजूला सारून संकेतस्थळाच्या अपडेटेशनचे काम हाती घ्यावेच लागले. काम सलग महिनाभर चालल्याने लेखनस्पर्धेकडे लक्ष देता आले नाही त्यामुळे लेखनस्पर्धा आयोजनाच्या समस्यांत आणखी भर पडली.
 
     पण.... आता एकदाचे संकेतस्थळ अद्ययावतनाचे काम पूर्ण झाले आहे. आपणास अनेक बदल झालेले दिसतील. संकेतस्थळाच्या आकर्षकपणात नक्कीच भर पडलेली आहे. आपणास जाणवलेल्या बदलाबद्दल अभिप्राय लिहिल्यास तसेच अजून काही तृटी जाणवल्यास ..... तसे खालील प्रतिसादात लिहिल्यास माझ्या व तुमच्याही नक्कीच उपयोगाचे ठरेल, अशी आशा आहे.

प्रवेशिकांतील उणिवा आणि तृटी :
  1. प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही अनेकांनी प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. संबधितांना विनंती आहे कि त्यांनी प्रथम आपले स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.
  2. सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल.  त्यासाठी  Fingure-Right  लेखन करा  Fingure-Leff  येथे क्लिक करा. या धाग्यावर क्लिक करून आपली प्रवेशिका नव्याने सादर करावी.
  1. अनेकांना तांत्रिक समस्यांमुळे आपल्या प्रवेशिका सादर करता आल्या नाहीत. त्यांना नेमक्या काय समस्या आल्यात ते त्यांनी कळवल्यास त्यांना प्रवेशिका दाखल करण्याची संधी दिली जाईल.
  2. जसजशा उणिवा आढळतील तसतशा अन्य सूचना दिल्या जातील. त्यामुळे या धाग्यावर वरचेवर भेट द्यावी. काही समस्या उद्भवल्यास किंवा मार्गदर्शन लागल्यास खाली प्रतिसादात लिहावे.
  3. प्रवेशिकेचे शीर्षक युनिक/एकमेवाद्वितीय म्हणजे अन्य शीर्षकाशी जुळणारे नसावे. शीर्षकात प्रवेशिका अथवा स्पर्धेचा अथवा लेखनप्रकाराचा उल्लेख असू नये. मागील वर्षी एकाच शीर्षकाच्या अनेक प्रवेशिका असल्याने परीक्षकांकडून आलेले गूण नेमके कोणत्या प्रवेशिकेचे आहे हे ठरवणे अवघड गेले होते. अशा स्थितीत एका प्रवेशिकेचे गूण दुसऱ्याच प्रवेशिकेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब सर्वांनी संपादन करून शीर्षकात दुरुस्ती करून घ्यावी.
     
- गंगाधर मुटे
 
Share

प्रतिक्रिया