नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
विठ्ठलभक्ती
सकाळच्या पारी, हाक मारीत आला वाणी,
विठ्ठू जनीच, भरी पाणी.
सकाळच्या पारी, हाक मारीत आला माळी,
विठ्ठू जनीच, पीठ चाळी.
सकाळच्या पारी, हाक मारीत आला वाणी,
विठ्ठू जनीला, घाली पाणी .
सकाळच्या पारी, दार उघडितो दोन्ही फळ्या,
दारा समोर तुळशीच्या, विठ्ठू तोडीतो होता कळ्या.
सकाळच्या पारी, जनी म्हनीती भजन,
चंद्रभागेच्या पाण्यानं, रोज भरीते रांजण.
-----------------------------------------------------------
प्रतिक्रिया
फारच सुंदर आहे हे गीत. हा
फारच सुंदर आहे हे गीत.
हा ठेवा जपून जतन करायलाच हवा.
शेतकरी तितुका एक एक!
हो नककीच जतन करु.
धन्यवाद
ओव्या
मला मझ्या बालपनि मोथ्य वहिनिच्या तोन्डून ऐक्लेल्य ओव्यान्चि आथवन आलि.
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra