नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनुल्लेख !!
भासेना ही गरज तुझी ही,
सरकारला अथवा जनाला !
नोंद घ्यावया वेळ कुणाला?
अनुल्लेख टोचतो मनाला !!
शेतकरी मेला तरीही,
अडत त्या वीन घास नाही!
बुडून जाता कर्जात य़ा,
मूक्ततेची आसही नाही!!
केंद्रस्थ का मनीषा तुझी,
वर्तुळात ना स्थान तुम्हाला !
नोंद घ्यावया वेळ कुणाला ?
अनुल्लेख टोचतो मनाला !!
कुणा मताची गरज नाही,
तुजवीन काही अडत नाही !
आक्रोश आंदोलनातला
तुझा कुणाला पसंत नाही !!
अपेक्षेत का तोलतो स्वताला,
दुर्लक्षित तु कणा कणाला !
नोंद घ्यावया वेळ कुणाला ?
अनुल्लेख टोचतो मनाला !!
जगण्याची तुझी रीत वेगळी,
काळी माती माय माउली !
अपेक्षित प्रतिसाद पावसाचा,
प्रतीक्षा का त्यातच अडली ?
सातबाराच्या कर्ज नोंदी,
छळतात त्या तुझ्या मनाला !
नोंद घ्यावया वेळ कुणाला ?
अनुल्लेख टोचतो मनाला !!
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!