गझल: पुठ्ठ्यास तख्त केले
वाहून सर्व गेले पहिल्याच पावसाने.
सांगा कसे जगावे बर्बाद माणवाने.
इतकेच सांगतो मी माझ्या अनुभवाने,
पदरात पडत नाही नुसतेच या मनाने.
काही करून नेते दिल्लीत चालले अन,
पुठ्ठ्यास तख्त केले गल्लीतल्या नराने.
शेतात मस्त यंदा अंकूरले बियाणे,
जाळून पण तयाला टाकू नये तनाने.
पडल्या 'प्रदीप' माझ्या एकूण एक दाढा,
करतो तरी पहा मी भोजन किती सुखाने.
गझलकार : प्रदीप थूल, हिंगणघाट.

बहोत बढिया! गांधीजी!!!!
Dhirajkumar Taksande
वाहून सर्व गेले पहिल्याच पावसाने.
करतो तरी पहा मी भोजन किती सुखाने.
वाॅ!! वाॅ!!! गांधीजी, मजा आ गया।
ा
व्वाह .
Narendra Gandhare
बहोत बढीया गांधीजी...
क्या खुब लीखा....
प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*