दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
पंचेवीस/तीन/दोन हजार तेरा
#माझी_गझल #अभय #गंगाधर-मुटे #माझी-वाङ्मयशेती
========
प्रतिक्रिया
मुकुंदराज कविता ग्रंथालय, अंबाजोगाई - फेसबूक
Raj Pathan, Amar Habib and 2 others like this.
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे.....
..............................चूपके चूपके रात दिन...... याद है...! से बढकर और भी कुछ जियादा......
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
................. वाह वा बहोत बढिया.
मराठी कविता समूह - फेसबूक
Marathi Kavita - मराठी कविता समूह लिंकवरील प्रतिसाद
Jaam avadli.
Fakt ek vicharu ka?
Itarane ha hindi ahe ki marathi?
हटके रदीफ... पण सुंदर निभावली आहे..
फेसबूकवरील प्रतिसाद
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे...
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे...........
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
बेम्भाटे मास्तरांची शाळा
Shrikant Zade, Kalpi Joshi, Jayashree Ambaskar and 3 others like this.
-------------------------------------------------------------------
Gazalkar : गझलकार : श्रीकृष्ण राऊत
Badiujjama Gulamdastgir Birajdar, Milind Dhumale andSudhakar Kadam like this.
------------------------------------------------------------------
Gazalyaar
Gazalyaar या ग्रूपव्रील प्रतिसाद
Jayashree Ambaskar and Pralhad Deshpande like this.
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
------------------------------------------------------------------
माझी वाङ्मयशेती - या पेजवरील प्रतिसाद
52 people like this.
१) किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे.....
............चूपके चूपके रात दिन...... याद है...! से बढकर और भी कुछ जियादा......
२) तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
................. वाह वा बहोत बढिया.
३)तुझा केशशृंगार ..... यात शेवटी बहुतेक पायथ्याला असेल.
४) एकत्व..... लाजवाब.
५).................... !!! वाह वाह वाह... जबरदस्त गझलियत.
६) मुळी थांग पत्ता मनाचा न येई.... आणि कचरणे... ! सलाम.
नंतरचे शेर तर शायराला शब्दांची पकड मिळाल्याने लाभलेली समाधी अवस्थाच.......... अव्वल नंबर गज़ल.....! ( छोटा मूँह बडी बात)
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
या धाग्यावरील आपला प्रतिसाद मी वाचला होताच.
तुमच्या त्या प्रतिसादाने या रचनेचा स्वाद माझा मलाच
आणखी अनुभवता आला.
बोलीभाषेतील "पायशाला" या शब्दाला प्रमाण भाषेत अन्य पर्यायी शब्द आहे काय?
परत एकदा आभार..!
मी डिक्शनरी एंट्री देतोय...
पायतें= बिछान्याची अगर डोंगराची पायाकडील बाजू
संदर्भ- मराठी शब्द रत्नाकर ले. कै. वा.गो. आपटे
पायते... चे पायत्याला... किंवा आम्ही इकडे वापरतो ते 'पायथ्याला'.
आपण वापरलेला शब्द बोलीभाषेतील आहे हे आपण नमूद केलेलेच आहे.
..............................................................
Prashant Panwelkar and Vijay Deshpande like this.
..............................................................
Akshay Mute, Gaurav Chandankhede and Sachin Vanjari like this.
----------------------------------------------
मी मराठी वरील प्रतिसाद
मी मराठी वरील प्रतिसाद.
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मला तर अजूनही (लग्नाला २५ च्या अधिक वर्ष होईनही) मनाचा थांग पत्ता लागत नाही. आवडली
Posted by निवांत पोपट on सोम, 25/03/2013 - 19:59
का कोणास ठाऊक पण वाचताना गुलाम अलीची 'चुपके चुपके रात दिन' आठवली..कदाचित 'छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे' ह्या ओळीमूळे असेल..
Posted by राजे on सोम, 25/03/2013 - 20:20
Posted by आतिवास on सोम, 25/03/2013 - 22:03
आणि 'चुपके चुपके रातदिन ..."आठवलं!
Posted by शरद कोर्डे on मंगळ, 26/03/2013 - 12:42
मायबोली वरील प्रतिसाद.
मायबोली वरील प्रतिसाद.
बेफ़िकीर | 25 March, 2013 - 08:03
व्वा! मस्त! वगैरे वगैरे अगदी सहज आले आहे.
इथरणे म्हणजे काय?
तसेच, उतावीळ होतो तुला ऐकण्याला - यातील 'तुला ऐकणे' हे हिंदीसारखे आले आहे. मराठीत आपण सहसा तुझे ऐकणे असे काही म्हणतो. तुम्हे सुनने के लिये बेताब था सारखे वाटत आहे तुला ऐकणे!
लहजा फार आवडला. अनेक ओळी आवडल्या.
धन्यवाद
vinayakparanjpe | 25 March, 2013 - 08:08
मस्त!..
जयवी -जयश्री अंबासकर | 25 March, 2013 - 08:13
मला पण आवडेश
"इथरणे" च्या ऐवजी "इतरणे" असं असावं बहुतेक

म्हणजे .......तुम्हारा इतराना.....वगैरे वगैरे
विस्मया | 25 March, 2013 - 08:14
व्वा ! मस्त, आवडली
"अभय" काय आहे ?
वैद्यबुवा | 25 March, 2013 - 08:36
छान आहे! आवडली
साती | 25 March, 2013 - 09:04
मस्त आहे.
आवडली.
एक छान ठेका आहे पूर्ण गझलेला.
इथरणे शब्द कळला नाही.
कांदापोहे | 25 March, 2013 - 09:15
मला पण आवडली.
श्यामराव | 25 March, 2013 - 09:17
"इथरणे" म्हणजे - भाव खाणे....
वगरै.... वगरै..... आवडले.
डॉ.कैलास गायकवाड | 25 March, 2013 - 09:31
क्या बात है मुटेजी....जबरी गझल.
गंभीर समीक्षक | 25 March, 2013 - 10:37
मुद्यांच्या मानाने वृत्त फारच लांब झाले आहे. गझलेपेक्षा जरा प्रेमकविता अधिक वाटत आहे. कळावे
गं स
गिरीजा | 25 March, 2013 - 12:14
सुंदर रचना !!
गंस शी सहमत !!
अरविंद चौधरी | 25 March, 2013 - 12:52
सुंदर...
'' अभय '' कोण ?
वैभव वसंतराव कु... | 25 March, 2013 - 13:11
वा मुटे सर वा
रिया. | 25 March, 2013 - 13:20
वाह व्वाह! क्या बात है
मला आवडली
रिया. | 25 March, 2013 - 13:23
पुन्हा वाचली!
म स्त च!
गंगाधर मुटे | 25 March, 2013 - 14:23
इतरणे हा शब्द आमच्याकडे चांगला प्रचलीत आहे. त्याचा अर्थही हिंदी "इतराना" पेक्षा थोडा वेगळा जातो.
इतरणे या शब्दाला आमच्याकडे पर्यायी शब्द आहेत जसे की, येलणे, येल पाडणे पण शुद्ध/प्रमाण/लिखीत पुस्तकी भाषेत या शब्दाला पर्यायी शब्द असेल असे वाटत नाही.
इतरणे = येलणे = येल पाडणे = स्वत:चे कौतुक दर्शविणार्या शरीर-अवयवाच्या नखरेल पण असंबद्ध हालचाली करणे, असा काहेसा अर्थ
*
"अभय" हा माझा मक्ता आहे. हा मक्ता मी सर्वच काव्यप्रकारातील रचनेत वापरत असतो. अगदी कवितेत सुद्धा.
*
गं स. आपाल्याशी अंशत: सहमत, अंशत: असहमत, उरलेले अंश रामभरोसे.
आपण या मुद्यावर सविस्तर बोलू; यथावकाश बोलू पण नक्की बोलू.
@mit | 25 March, 2013 - 18:07
प्रचंड सुंदर.
अनिलभाई | 25 March, 2013 - 18:14
वगैरे वगैरे मस्तच..
आवडली वगैरे वगैरे..
भारती बिर्जे डि... | 25 March, 2013 - 23:13
मस्त शुद्ध रोमँटिक वगैरे वगैरे..
पुरंदरे शशांक | 26 March, 2013 - 10:34
सुंदर, सुंदर आणि सुंदर .......
मुग्धमानसी | 26 March, 2013 - 10:38
फार फार सुंदर प्रेमकाव्य!!!
मुक्तेश्वर कुळकर्णी | 26 March, 2013 - 10:52
गझल आवडली !
विजय दिनकर पाटील | 26 March, 2013 - 11:38
आवडली गझल.
उमेश वैद्य | 26 March, 2013 - 11:43
इतरणे = येलणे = येल पाडणे = स्वत:चे कौतुक दर्शविणार्या शरीर-अवयवाच्या नखरेल पण असंबद्ध हालचाली करणे, >>>>>>>>> यालाच 'विभ्रम' हा शब्द आहे. अर्थाच्या बर्याच जवळ जाणारा.
गझल आवडली>
शुभानन चिंचकर 'अरुण' | 26 March, 2013 - 14:21
छान आहे गझल !
मिसळपाव वरील प्रतिसाद
मिसळपाव वरील प्रतिसाद.
प्रथम फडणीस - Mon, 25/03/2013 - 15:36
गझल मस्त... विशेषतः
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
प्रचंड आवडेश...
मनराव - Mon, 25/03/2013 - 15:42
छान
aparna akshay - Mon, 25/03/2013 - 15:43
मस्त ! मस्त!
बॅटमॅन - Mon, 25/03/2013 - 15:46
वाह!!!!!!
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
कितीदा असे काव्य हे वाचताना, मनाची अहा लागली पूर्ण तंद्री
कसे शब्द ते देखणे-आशयो ही, सवे वृत्त आहे वगैरे वगैरे!!!
मिसळलेला काव्यप्रेमी - Mon, 25/03/2013 - 16:13
मस्तच... भन्नाट!!
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
क्या बात!! व्वाह!!!
मदनबाण - Mon, 25/03/2013 - 16:20
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
खल्लास !
मदनबाण.....
शुचि - Mon, 25/03/2013 - 16:34
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
सुरेख!!
अक्षया - Mon, 25/03/2013 - 17:32
+ १
क्या बात है !
परिकथेतील राजकुमार - Mon, 25/03/2013 - 17:38
आज बर्याच दिवसांनी मिपावरती आलो आणि पहिला हाच धागा उघडला.
अप्रतिमच !
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
हे खासच !!
पिलीयन रायडर - Tue, 26/03/2013 - 19:20
फारच सुंदर...!!
श्री गावसेना प्रमुख - Mon, 25/03/2013 - 17:46
सगळी कडे कोरडी जमीन्,दुष्काळ दिसतोय,
अन इथे बघतोय तर मधच मध टपकतय
गंगाधर मुटे - Tue, 26/03/2013 - 18:51
हाहाहा
अहो, दुष्काळाला काय प्रेमाचे वावडे असते?
लाखो शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्यात; पण म्हणून काही प्रेमाची चंदेरी/रंगेली दुनिया थोडीफार तरी थबकली काय?
राही - Mon, 25/03/2013 - 18:12
कविता खूपच आवडली, पण..
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना?
मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...
गंगाधर मुटे - Tue, 26/03/2013 - 18:56
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना?
मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...
थोडयाशाने वृत्त गंडले ना!
आशय/प्रश्न चांगला आहे.
रेवती - Mon, 25/03/2013 - 19:19
वाह! फार सुरेख कविता.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - Mon, 25/03/2013 - 19:21
व्वा. लै भारी.
-दिलीप बिरुटे
वल्ली - Mon, 25/03/2013 - 19:46
वाह!!!
काय सुरेख ग़ज़ल लिहिलीय.
मन्द्या - Mon, 25/03/2013 - 19:48
शब्द नाहीत किती आवडली ते सांगायला..
पैसा - Mon, 25/03/2013 - 19:50
सुरेख कविता!
o ज्योति कामत o
दादा कोंडके - Mon, 25/03/2013 - 19:51
खणखणीत गझल!
अत्रुप्त आत्मा - Mon, 25/03/2013 - 20:01
आदूबाळ - Mon, 25/03/2013 - 20:37
झकास!
अभ्या.. - Mon, 25/03/2013 - 20:46
अभयराव. मस्तच हो एकदम.
अग्दी कौतुक, टाळ्या, स्टॅण्डींग ओव्हेशन वगैरे वगैरे.
पूजा पवार. - Mon, 25/03/2013 - 21:00
मस्त मस्त मस्त !!!!!!
झक्कासच मुटे काका
प्यारे१ - Mon, 25/03/2013 - 21:28
कातिल गजल!
अनुप कुलकर्णी - Tue, 26/03/2013 - 19:11
म हा न!
सुमीत भातखंडे - Tue, 26/03/2013 - 19:17
मस्त गझल.
मालोजीराव - Tue, 26/03/2013 - 19:42
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
वाह वाह ! क्या बात
थोड्या सारख्या ओळी वाटल्या म्हणून टाकतोय…
तनको तनको उधरे पद औचक I ' शंभु ' कसु पडयो पावतसे II
दिनमेंह लगेह पगेह रहे I सब रैन कुहीसी जगावतसें II
-छत्रपति संभाजीराजे
एकदम रोमँटिक .........वगैरे वगैरे
गंगाधर मुटे - Wed, 27/03/2013 - 12:54
जयवीतै,
मी आजवर एकही प्रेम विषयाला अनुसरून एकही प्रेमकाव्य लिहिलेलं नव्हतं. कारण शृंगार हा माझ्या लेखनीचा ना तर विषय आहे नाही लेखणीचे उद्दीष्ट.
मात्र गझल लिहायची पण गझलेचा मुळ केंद्रबिंदू असलेला "प्रेम" हा विषय सोडूनच द्यायचा म्हटले तर माझ्यातल्या गझलकाराला ते पचणीही पडत नव्हतं. शृंगार हा विषय मला वर्ज्य असला तरी माझ्यातल्या गझलकारावर तसे बंधन लादणे, मला फारसे संयुक्तित वाटले नाही.
जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मुडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला नकोसं/नावडीचं असलं तरीही बरंच काही सुचत राहतं; एखादवेळ चक्क काही शब्द लयबद्ध होऊन ओठावर रेंगाळायला लागतात. माझा एक अनुभव असाही आहे की, एकदा दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं एक द्वीअर्थी फिल्मी गीत गुणगुणतांना त्यासोबतच त्यापुढे माझ्या तोंडातून काही ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या होत्या. त्या ओळी माझ्यामते तरी दादा कोंडकेंच्या ओळीपेक्षा जास्त दर्जेदार, कसदार आणि श्रवणीय होत्या. मात्र त्या ओळी अर्थातच द्वीअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत. त्या ओळींच्या दफणविधीचा कार्यक्रम त्याच क्षणी तिथेच पार पडला.

मात्र मला त्याच क्षणी जाणीव झाली की आपण आपल्यातल्या कवीवर/गीतकारावर एक मोठा अत्याचार/अन्याय केलेला आहे. मी आणि माझ्यातल्या कवी या दोन वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत, याचीही जाणीव झाली.
त्या दिवशी अचानक त्या ओळी सुचत गेल्या आणि मतला बनत गेला. यावेळेस मी माझ्यातल्या गझलकाराला अजिबात अटकाव केला नाही. त्याला दिलोजानसे सहकार्य केले आणि त्यातूनच ही गझल साकारली.
ही गझल सफल झाली आहे. शृंगार हा विषय घेऊन चांगल्या रचना माझ्या हातून रचल्या जाऊ शकतील याचा अदमास आलेला आहे; मात्र तरीही यापुढे एकट-दुकट प्रसंग वगळता या विषयावर कौशल्य दाखविण्याची स्वैर अनुमती मी माझ्या लेखणीला देणार नाही. माझ्यासोबत जगायचे तर माझ्या लेखणीला माझ्या आवडीचेच विषय हाताळावे लागतील. एका ध्येयपूर्ण उद्देशासाठीच जगावे लागेल आणि त्यात शृंगाररसाला फारसे स्थान नाही.
तुम्हाला सुद्धा यानंतर एकदम रोमँटिक वगैरे वगैरे रचना माझ्याकडून वाचायला मिळण्याची शक्यता धूसर आहे कारण शृंगार हा माझा विषय नाही.
जयवी - Wed, 27/03/2013 - 17:52
गंगाधरजी.... तुम्ही म्हणताय ते पटतंय असं वाटतंय
हल्ली हल्ली जरा वेगळं लिहायचा प्रयत्न सुरु केलाय. एकेकाचा पिंड असतो पण दुसर्या प्रांतात डोकवायचंच नाही असं नसतं ना.... म्हणून तुम्ही जशी तुमच्या लेखणीला सुट देताय तशीच थोडीफार मी पण त्या प्रयत्नात आहे 
पटलं असं न म्हणता पटतंय असं वाटतंय असं म्हणतेय कारण तुम्ही जसं म्हणताय की शृंगार तुमचा प्रांत नाही तसं मी म्हणेन की माझा प्रांत शृंगार रसच आहे
तिमा - Wed, 27/03/2013 - 12:42
मराठीतली 'चुपके चुपके' च जणु.
श्रिया - Fri, 29/03/2013 - 14:19
अप्रतिम! खूप आवडली!
मूकवाचक - Fri, 29/03/2013 - 14:49
अप्रतिम कविता
शृंगार हा माझा विषय नाही
शेतकरी तितुका एक एक!
आता (परत) वाचली.
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे आता (परत) वाचली...
मी गझलेच्या वाटेला अजिबात जात नाही... फार क्वचित गझला मला "आवडतात"... पण ही गझल अतिच अप्रतिम वगैरे आहे.... आहाहा!
पुन्हा पुन्हा वाचुनही मन भरत नाहीये... जियो!
प्रेमकाव्याचा अनोखा खजिना
वगैरे वगैरे खुप आवडली. रियाने बाकी लिहिलच आहे, तेच वाटतय अगदी, प्रेमकाव्याचा अनोखा खजिनाच ही गझल म्हणजे...
facebook Link
facebook Link
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0QX2vUUsmd4SuG9ztH51ft...
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण