Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

मातृत्वाचा शृंगाररस

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 7:47 PM IST, शनी October 19, 2024

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

शृंगाररस
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
माझी कविता
कविता
काव्यधारा
स्त्रीचे विश्व रूप दर्शन

navnath pawar

सोमवार, October 21, 2024 - 21:13
Permalink
New

वाह! सुरुवात शृंगार रसाचा परिपाक आणि  शेवट एका तेजस्वी विचाराने.. मूळ गाभा भारी आहे.



स्त्रीचे विश्व रूप दर्शन घडवणारी कविता. स्त्रीकडे रमणी म्हणून पहायचा प्रघात आहे. त्यात वावगे काहीच नाही. मात्र तिला त्याच त्या रूपाच्या साखळदंडात कैद केले जाते, तेव्हा तिचे आत्मभान जागे करायची गरज पडते. ही कविता तो परिणाम साधून जाते. अंतर्मुख करते.

 

- नवनाथ पवार 

  • Log in or register to post comments
श्रृंगार रसातुन विर, करुणा,

अतिथी सदस्य (-)

सोमवार, October 21, 2024 - 21:18
Permalink
New

श्रृंगार रसातुन विर, करुणा, भक्ति, मातृत्व रसा कडे परावर्तीत होणार हे सर्वश्रेष्ठ काव्य अप्रतिम, विलक्षण आणि शब्दापलीकडले आहे मुटे सर . खरंच अंतरंगाचा ठाव घेणारी रचना. ... आपल्या काव्य प्रतिभेला माझा साष्टांग दंडवत. 

 

- Sanjay Bhong   (Sanjay Bhong)

  • Log in or register to post comments
क्या बात है संपूर्ण नऊ रसात

Sandhya Patil

सोमवार, October 21, 2024 - 21:21
Permalink
New

क्या बात है संपूर्ण नऊ रसात भिजवली कविता खूप अर्थपूर्ण, आशयघन नि देखणी रचना साकारली अप्रतिम अप्रतिम

खूप अभिनंदन

 

- Sandhya Patil

  • Log in or register to post comments
वाह वाह अति सुंदर विदुशकालाही

अतिथी सदस्य (-)

सोमवार, October 21, 2024 - 21:25
Permalink
New

वाह वाह अति सुंदर विदुशकालाही आपलीसी वाटावी व संत म्हणतांनाही आपलीसी वाटावी अशी दुहेरी शृंगाराणे सजलेली व गोडव्याने परिपूर्ण अशी ही काव्य रचना

खूपच मनमोहक व छान

 

- Baburao Ganpat Narote

Baburao Ganpat Narote

  • Log in or register to post comments
एकदम झक्कास ... एकदम झक्कास.

Narendra Gandhare

सोमवार, October 21, 2024 - 21:27
Permalink
New

एकदम झक्कास ... एकदम झक्कास.

 

- Narendra Gandhare

  • Log in or register to post comments
अफाट सुंदर ,वाह ... सर

ravindradalvi

सोमवार, October 21, 2024 - 21:28
Permalink
New

अफाट सुंदर ,वाह ... सर

 

- Ravi Dalvi

  • Log in or register to post comments
अप्रतिम शब्द संपदेने रंगवली..

अतिथी सदस्य (-)

सोमवार, October 21, 2024 - 21:31
Permalink
New

अप्रतिम शब्द संपदेने रंगवली...सुरुवातीची काही कडवी वेगळीच अन् समारोप तर अंतर्मुख करणारा ठरला...सर्व रस,अन् अजूनही काय काय.. वाह!

 

- Sanjay Kaware

  • Log in or register to post comments
शृंगार, , करुणा, भक्ती,

तुळशीराम बोबडे

सोमवार, October 21, 2024 - 21:33
Permalink
New

शृंगार, , करुणा, भक्ती,

रस ओतले किती

नमन गंगाधरा

धन्य काव्यनिर्मिती

 

- Tulshiram Bobade

  • Log in or register to post comments
काही दिवसांपूर्वी आपण शृंगार

Prashant Zilpe

सोमवार, October 21, 2024 - 21:37
Permalink
New

काही दिवसांपूर्वी आपण शृंगार प्रधान काव्य करण्याविषयी पोस्ट टाकली होती. आता लगेच हे अप्रतिम काव्य! १८/१०/२४ म्हणजे कालच.

आपली प्रतिभा कमालीच्या बहारात असल्याचे दिसत आहे.

शृंगार आणि भक्ती रसाचे एकत्रित इतके विलोभनीय स्वरुप फार क्वचीतच बघायला वाचायला मिळते.

होउन जाउ द्या अश्याच काही आणखी सर्वांग सुंदर कविता. मंत्रमुग्ध करणाऱ्या.

 

- Prashant Zilpe

  • Log in or register to post comments
एकदम बेस्ट !

दत्ता राऊत

सोमवार, October 21, 2024 - 21:38
Permalink
New

एकदम बेस्ट !

 

- दत्ता राऊत

  • Log in or register to post comments
वाह गंगाधरजी, शृंगार ते

अतिथी सदस्य (-)

सोमवार, October 21, 2024 - 21:40
Permalink
New

वाह गंगाधरजी, शृंगार ते भक्तिमार्गाचा सुंदर मिलाप...

 

- Vidyanand Hadke

  • Log in or register to post comments
शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम!

Sanjay Thakre

सोमवार, October 21, 2024 - 21:43
Permalink
New

शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम! अप्रतिम आणि केवळ अप्रतिम!! सारं गर्भित!!

 

- Sanjay Thakre

  • Log in or register to post comments
खूप सुंदर सर!

Pradip Deshmukh

सोमवार, October 21, 2024 - 21:45
Permalink
New

खूप सुंदर सर!

 

- Pradip Deshmukh

  • Log in or register to post comments
सर्व सजीव सृष्टी मधील माता

A.B.Patil

बुधवार, October 23, 2024 - 14:28
Permalink
New

सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे.

मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते.

माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.

सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही.

मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 20811 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,316 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,203 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,244 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,039 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,497 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,219 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,864 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,110 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,010 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,342 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,270 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,253 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,283 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 6 सदस्य उपस्थित आहेत.
  • spatil
  • Rutuja Bane
  • Narendra Gandhare
  • admin
  • Nisha kale
  • डॉ. मीरा पंडित

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 48 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • 'शिवाराचा अदृश्य कणा ते कृषी…
    1 hour 48 minutes ago
  • कथाकार प्रतीक खोडपे यांनी …
    1 hour 52 minutes ago
  • निलेश दिगंबर तुरके यांनी …
    1 hour 54 minutes ago
  • प्रतीक खोडपे यांनी या…
    1 hour 55 minutes ago
  • डॉ. ज्ञानेश वाघमारे सरांनी …
    1 hour 56 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस - 2 260
आजचे शेतमालाचे बाजारभाव 208
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 150
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 124
नागपुरी तडका - ई पुस्तक 61
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 61
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 59
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 59
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 54
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 49
उद्देश आणि भूमिका 49
गणपतीची आरती ॥३५॥ 37
किती चाटणार भारतपुत्रा? 33
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 33
कापला रेशमाच्या सुताने गळा 31
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 30
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 30
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 27
रानामधले शेर...! 25
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 18
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,035
माझे फेसबूक स्टेटस-1 181,016
शुभारंभ 134,947
रानमेवा - भूमिका 109,395
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,490
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,121
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,547
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,997
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,606
उद्देश आणि भूमिका 77,603
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,911
विचारपूस 71,841
गणपतीची आरती ॥३५॥ 67,862
सत्कार समारंभ : वर्धा 66,745
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,346
किती चाटणार भारतपुत्रा? 61,921
जात्यावरची गाणी 56,042
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,915
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,072
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,425
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini