Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                    - गंगाधर मुटे "अभय"

-------------------------------

दिनांक १७ जानेवारी २०१५ ला बुलडाणा येथील १३ व्या अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनातील कवीसंमेलनातही कविता सादर केली. उपस्थित रसिकांकडून या कवितेला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली. रसिकांना मनपूर्वक धन्यवाद.

कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

------------------------------
श्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. अवश्य ऐका.
-------------------------------------

Share

प्रतिक्रिया

 • संपादक's picture
  संपादक
  शुक्र, 05/08/2011 - 23:20. वाजता प्रकाशित केले.

  मिसळपाववरील parag p divekar यांचा प्रतिसाद

  वाहव्वा मुटे साहेब

  एकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.
  शब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.

  शेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.

  वाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.

 • संपादक's picture
  संपादक
  शुक्र, 05/08/2011 - 23:23. वाजता प्रकाशित केले.

  मिसळपाववरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद

  लय भारी!! एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.

 • संपादक's picture
  संपादक
  शुक्र, 05/08/2011 - 23:24. वाजता प्रकाशित केले.

  फेसबुकवरील फेस बुके यांचा प्रतिसाद

  आपली ही वीर रसातील कविता अत्यंत घणाघाती की काय म्हणतात,तशी वाटली.मनापासून अभिनंदन.

  पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट !

  आता हे काही मनाला पटले नाही.पौरुष हे असतेच.त्याचे 'घुट' कशाला लावावे लागतात?हे समजले नाही.मला तर आधी व्हिस्कीचे घुट आहेत की काय असे दिसले.आता माझी दृष्टी थोडी अधू आहे,त्याला माझा नाईलाज आहे.आपली कविता सध्याच्या ज्वलंत परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरावी.मला ओघातच लहानपणी वाचलेली कविता आठवली.शिरवाडकरांची-

  "मोरासारखा छाती काढून उभा रहा.
  तिच्या नजरेत नजर घालून पहा.
  सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...

  प्रेम कर भिल्लासारखं,बाणावरती खोचलेलं,
  मातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं!"(कुसुमाग्रज)

  आता यात ओळी थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील.तर एवढे क्षम्य असणारच.आता ही कविता मला का आठवली हा एक महान दुर्बोध प्रश्नच आहे.कदाचित या प्रतिक्रियेइतकाच.तर ते अर्थातच असो. एक चांगली कविता!
  आपल्या वाड:मय शेतीत कवितांचे असेच मनमुराद पिक येवो ही शुभेच्छा.धन्यवाद.

 • संपादक's picture
  संपादक
  शनी, 06/08/2011 - 12:35. वाजता प्रकाशित केले.

  मिसळपाववरील सौंदर्य यांचा प्रतिसाद

  तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.

  तुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.

  खूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.

 • संपादक's picture
  संपादक
  शनी, 06/08/2011 - 12:37. वाजता प्रकाशित केले.

  मिसळपाववरील अभिजीत राजवाडे यांचा प्रतिसाद

  हल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.
  कविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.

 • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
  प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  सोम, 08/08/2011 - 18:34. वाजता प्रकाशित केले.

  नागपुरी तडका बाकी जोरदरा झालाय.
  अजून येऊ द्या.

  -दिलीप बिरुटे

 • अनिलमतिवडे's picture
  अनिलमतिवडे
  गुरू, 11/08/2011 - 10:47. वाजता प्रकाशित केले.

  मुटेजी,
  लई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता !
  या ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही. Smile

  अनिल

 • संपादक's picture
  संपादक
  गुरू, 11/08/2011 - 10:53. वाजता प्रकाशित केले.

  मायबोलीवरील देवनिनाद यांचा प्रतिसाद.

  सणसणीत आणि तितकीच एक अ‍ॅक्शनपॅक्ड कविता ... वा !! मुटेसाहेब ..

 • अतुल कडलग's picture
  अतुल कडलग
  शुक्र, 21/10/2011 - 22:15. वाजता प्रकाशित केले.

  एकदम मस्त झाला आहे नागपुरी तडका !!! ..

 • Kushagra Mungee's picture
  Kushagra Mungee
  मंगळ, 04/09/2012 - 16:44. वाजता प्रकाशित केले.

  श्री मुटे साहेब,

  अप्रतिम, सणसणित आणखीन तेवढीच मनाला पूर्णपणे बांधून ठेवणारी .

  श्री प्रमोद देव, ह्यांनीही छान प्रस्तुतीकरण केलंय.

  सादर,
  कुशग्र मुन्गी
  +९१-९८९-०८५-१५६१

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 22/02/2013 - 10:39. वाजता प्रकाशित केले.

  प्रतिसादाबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. Smile

  शेतकरी तितुका एक एक!