नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गेले चरून..
शेतात आज माझ्या, गेले चरून...साले
घामास जुंपता मी, गेले हसून ...साले...
पोटात अन्न नाही, विहरीत थेंब नाही...
ते ढेरपोट त्यांचे, जावे फुटून ...साले....
नावास वीज इथली, गर्मीत पोळतो मी
फलकास वीज देता, जावे जळून ...साले...
साेनेच पांढरे हे, उगवून नागडा मी
केसास रंग त्याच्या, जावे गळून ...साले..
कर्जात मी बुडालो, त्याचीच सावकारी
हे मोहपाश कसले, जावे सुटून ..साले...
गळफास लावतो मी, मृत्यूस पावतो मी
घामास काल माझ्या, गेले लुटून ..साले...
प्रतिक्रिया
आशयसमॄध्द गझल.....
वाह!
हेमंत साळुंके
पाने