Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 6:35 PM IST, मंगळ September 03, 2024

शेतकरी साहित्य चळवळ

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४  : वर्ष ११ वे

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी

यांच्या ८९  व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२४)  
सादर करीत आहोत.....

Sharad Joshi



विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ 
लेखनाचा विषय : शेतमालाचे भाव
 *Ad* प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी *Ad*
०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ 

 
या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०२४, पद्यलेखन स्पर्धा-२०२४, अनुभवकथन स्पर्धा-२०२४ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२४
  1.  गद्यलेखन स्पर्धा-२०२४ : विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध
  2.  पद्यलेखन स्पर्धा-२०२४ : विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) छंदोबद्ध कविता  ड) गझल   इ) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
  3. अनुभवकथन स्पर्धा-२०२२ : विभाग : अ) सुखद अनुभव ब) दुःखद अनुभव
  4. समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२४ : विभाग : अ) पुस्तक समीक्षण ब) ललित लेखांचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण

(समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. लेख/कविता "शेतमालाचे भाव" या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य आहे.)

प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे :
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
  • पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
  • एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.



निकाल : निकाल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण : नियोजित १२ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
 
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

 
  1. स्पर्धा ०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
  2. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. ONLINE लेखन करण्यासाठी *fr*  लेखन करा  *fl* baliraja.com/node/add/spardha-2024 *fl* या लिंकवर किंवा येथे क्लिक करा.
  3. स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका येथे baliraja.com/spardha-2024 पाहता येतील.
  4. लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे?  याबद्दल https://baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
  5. स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
  6. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- लेखनप्रकाराचा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील/विदेशातील पोस्टाचा निवासी पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
  7. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
  8. स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
  9. परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी/स्पर्धा व्यवस्थापक/स्पर्धा आयोजक/स्पर्धा संयोजक सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  10. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
  11. गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
  12. गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :
 
  1. स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  2. स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  3. स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
  4. एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
  5. परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. (परीक्षक मंडळात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार, शेतकरी, कामगार, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असेल.) सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
  6. सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
  7. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  8. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  9. निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  10. शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
आपले स्नेहांकित

 
संयोजक मंडळ
- गंगाधर मुटे 
- राजेंद्र फंड 
- संगीता थोरात

- मुक्तविहारी
*  *  *
  • अधिक माहितीसाठी साहित्य चळवळ किंवा फेसबुक गृप येथे भेट द्या.
*  *  *


शेतकरी साहित्य चळवळ
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४
शेतमालाचे भाव
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 9892 views

प्रतिसाद (2)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे

गंगाधर मुटे

गुरुवार, September 19, 2024 - 09:40
Permalink
New

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण

शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी

यांच्या ८९  व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२४)  

सादर करीत आहोत.....



*विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे*

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)



लेखनाचा विषय : *शेतमालाचे भाव*

प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी - *०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४*



अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

लेखनस्पर्धा-२०२४ सविस्तर माहिती - https://baliraja.com/wls-24

स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका - https://baliraja.com/spardha-2024 पाहता येतील.



*संयोजक मंडळ*

- गंगाधर मुटे

- राजेंद्र फंड

- संगीता थोरात

- मुक्तविहारी

 

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

  • Log in or register to post comments
गुगल मिट

admin

शुक्रवार, September 27, 2024 - 12:49
Permalink
New

गुगल मिट

 

ज्यांना अजूनही खाते तयार करता आले नाही, लॉगिन करता आले नाही.... त्यांचेसाठी आज 27 सप्टेंबर 2024 शुक्रवारला रात्री 9 वाजता गुगल मिट वर माहिती दिली जाईल.

 

संबंधितांनी खालील लिंकवर रात्री 9 वा जॉईन व्हावे.

 

Link :

https://meet.google.com/tss-oykb-dkt

  • Log in or register to post comments

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 11 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    23 hours 1 minute ago
  • 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
    23 hours 2 minutes ago
  • अंतर्मुख करायला लावणारी
    23 hours 5 minutes ago
  • अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
    23 hours 7 minutes ago
  • सुरेख आयोजन... पत्रिका
    23 hours 38 minutes ago

लोकप्रिय लेखन

Today's:

  • स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • पान हरवलेलं दिसतंय....
  • विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे
  • पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।।
  • शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती
  • आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!
  • कापला रेशमाच्या सुताने गळा
  • किती चाटणार भारतपुत्रा?
  • संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती

All time:

  • पान हरवलेलं दिसतंय....
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • पोळ्याच्या झडत्या
  • माझे फेसबूक स्टेटस-1
  • पान हरवलेलं दिसतंय....
  • शुभारंभ
  • रानमेवा - भूमिका
  • नागपुरी तडका - ई पुस्तक
  • आजचे शेतमालाचे बाजारभाव
  • सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता

Last viewed:

  • असे करावे महिला कवी-लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण!
  • अंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन
  • स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24
  • आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!
  • हे पान पहायची परवानगी नाही.
  • प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन
  • काळ्या काळ्या ढगांतून....
  • नांगरणी
  • पालवी एक संदर्भ
  • IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini