वृत्त - पादाकुलक द्विगुणित
सगळ्या कल्पनांमधला शेवट असतो नेहमी आनंदीच का?
दुःख असतीलच की सर्वांना मग गुरफटत बसतो मीच का?
शोधतो आज पळवाटा मी घाबरूनी अनामिक भीतीला,
सहनशक्ती न उरली, हिंमत सरली तरीही धाडसीच का?
सांगा रे कुणी दुःखाला त्या म्हणावे असतील अगणित वाटा,
जायचे न दुसरीकडे कोठे सगळे सोडून सापडतो मीच का?
वर्दळी यावे न आठवणींनी थोडे मन ही रमविले असते,
काय गोडी तिला, भेटायचे असते मजला ते एकांतीच का?
सगळे सुखाचे सोबती येथे उकरून जखमा मीठ चोळती,
काळजातल्या माझ्या दुःखाला उरला न वाली कुणीच का?

प्रतिसाद (1)
अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
'पादाकुलक द्विगुणित' या वृत्ताची अतिशय लयबद्ध आणि अचूक गुंफण या रचनेत पाहायला मिळते. रचनेतील प्रत्येक प्रश्न थेट मनाचा ठाव घेतो आणि वाचकांना अंतर्मुख करतो. विशेषतः "वर्दळी यावे न आठवणींनी... भेटायचे असते मजला ते एकांतीच का?" या ओळींतील भावनिक खोली आणि संवेदनशीलता मनाला स्पर्शून जाते.
एकाकीपणाची व्यथा, मनाची घालमेल आणि तरीही परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अत्यंत तरल आणि प्रभावी शब्दांत मांडली आहे. साधी, सहज समजणारी भाषा आणि गेयता यामुळे ही रचना वाचताना एक वेगळीच अनुभूती देते. लेखणीला मनापासून दाद! खूप छान!