वृत्त - लवंगलता.
अक्षरे लिहिलेली कागद, अजूनही कोरीच आहेत,
हृदयात या साठवलेले, घाव अजून बरीच आहेत.
माझे मला शोधतो मी, आजही विचारांच्या गर्दीत,
एकटाच नव्हे, सोबत हरवलेले अजून बरीच आहेत.
अक्कल पाजळतो वासरांसी, होऊन मी लंगडी गाय,
काय करावा गर्व? इथे बुद्धिमान अजून बरीच आहेत.
जाता जाता जाईन सांगून, पुन्हा भेटणे शक्य नाही,
एवढेच नाही, भोग शिल्लक अजूनही बरीच आहेत.
वाटेल संपले सारे, डोळ्यांसमोर पसरेल अंधार,
हरणार नाही एवढ्यात, पर्याय अजून बरीच आहेत.
चुकेल वाट तुझी, भरकटशीलही, नको हळवा होऊ,
फक्त ते एकच नव्हते, इथे ध्येय अजून बरीच आहेत.
मुक्तीसाठी का करतो विनवणी तू त्या कावळ्याची?
कावळा सोडूनही जगात पक्षी अजून बरीच आहेत.
जरी न कळले कुणा, ऋणानुबंध आपुले खरे आहेत,
फक्त एकच नाते नव्हते, अजूनही नाती बरीच आहेत.
का कुणाच्या जाण्याने कोलमडून जातो संदीप कुणी?
जो गेला तो आपला नव्हता, इथे अजून बरीच आहेत.
Main page content
छंदोबद्ध कविता
Public
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 1 hour ago
- 1 hour 1 minute ago
- 1 hour 4 minutes ago
- 1 hour 6 minutes ago
- 1 hour 37 minutes ago

प्रतिसाद (1)
'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम रचना! 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली यांचा सुंदर संगम या गझलेत पाहायला मिळतो.
रचनेची सुरुवातच इतकी बोलकी आहे की ती थेट काळजाला भिडते. आयुष्यातील वेदना, विचारांची गर्दी आणि स्वतःचा शोध या भावना अत्यंत संयतपणे मांडल्या आहेत. या रचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रवास. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून 'पर्याय अजून बरीच आहेत' आणि 'इथे ध्येय अजून बरीच आहेत' असा दिलेला आशेचा संदेश वाचकांना नवी उभारी देणारा आहे.
विशेषतः, 'मुक्तीसाठी का करतो विनवणी तू त्या कावळ्याची? कावळा सोडूनही जगात पक्षी अजून बरीच आहेत' हा शेर विचारांना नवी दिशा देणारा आणि अत्यंत प्रभावी उतरला आहे. प्रत्येक शेरातील आशयघनता, सोपी पण थेट भिडणारी शब्दकळा आणि शेवटच्या शेरातील 'संदीप' नावाची चपखल गुंफण मनाला स्पर्शून जाते.
अशाच दर्जेदार आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणाऱ्या रचना आपल्या लेखणीतून येत राहोत, हीच सदिच्छा! खूप खूप शुभेच्छा!