Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७

IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७
 
      अनेक साईटसवर सदस्यत्व घेणाऱ्यालाच प्रवेश असतो. आधी सदस्यत्व (Sign Up) घ्यायचे व त्यांनतर Log In करून प्रवेश घेतला तरच वेबसाईटवरील मजकूर वाचता येतो. अन्यथा वाचता येत नाही. उदा. फेसबुक, ट्विटर वगैरे. याउलट काही साईटवर सदस्यत्व न घेताही मजकूर वाचण्याची मुभा असते. मात्र लेखन करायचे असेल किंवा प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर  सदस्यत्व घेऊन लॉगिन करणे अनिवार्य असते. सदस्यत्व घेणे/रजिस्ट्रेशन/नोंदणी करणे आणि Sign Up करणे हे समानार्थी शब्द आहेत. वेगवेगळ्या साईटवर यापैकी वेगवेगळे शब्द वापरले जातात. 
 
सदस्यत्व कसे घेतले जाते याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक असल्याने सदस्यत्व कसे घ्यावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्रात्यक्षिक करण्यासाठी आपण https://baliraja.com/ या वेबसाईटचा वापर करणार आहोत.

प्रात्यक्षिक समजून खालीलप्रमाणे कृती करून www.baliraja.com वर सदस्यत्व घ्यावे.
 
सदस्यत्व कसे घ्यावे?

टप्पा -१
१)  https://baliraja.com/   या लिंकवर क्लिक करा.
२) साईट ओपन झाल्यावर पेज स्क्रोल केल्यानंतर "सदस्य व्हा" हा ब्लॉक दिसेल.
३) "सदस्य व्हा" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा.
४) "नवीन खाते बनवा" यावर क्लिक करा.
५) सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे. लॉगीन करताना सदस्यनाम/Username ची दरवेळेस गरज पडणार असल्याने आपला सदस्यनाम/Username आयडी व्यवस्थित लक्षात ठेवावा.
६) ईमेल (विरोप पत्ता) बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
७) सदस्याचे पूर्ण नाव या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
८) लिंग एक योग्य पर्याय निवडा.
९) फॉर्ममधील अन्य रकान्यात इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)
***

CAPTCHA या विभागात एक चित्र दिसेल. त्यावरील मजकूर ओळखून खालील रकान्यात जसाच्या तसा मजकूर लिहा. किंवा समोरील चौकोनात क्लिक करा. त्यांनतर जे चित्र येईल, त्या चित्रात दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रतिमांवर क्लिक करा किंवा गणित आल्यास गणित सोडवा.
***

सर्वात खाली  .नवीन खाते बनवा.. असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
टप्पा -२
आपण दिलेल्या E-Mail वर आपणास एक ईमेल येईल.
ईमेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल. त्या दोन्ही रकान्यात आपला नवीन हवा तसा पासवर्ड घाला. पासवर्ड शक्यतो कमीत कमी ८ अक्षरी/अंकी असावा.
***

टप्पा -३
आता आपण आपले सदस्यनाम/Username व Password वरून Log In/ Sign In करून  प्रवेश घेऊ शकता.

बघुयात की कोण-कोण बळीराजा डॉट कॉमवर सदस्यत्व घेतात. त्यावरून मला कळेल की कोण कोण शिकण्यास उत्सुक आहे आणि या कार्यशाळेचा किती उपयोग होत आहे.

 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
 

Share

प्रतिक्रिया