अनेक साईटसवर सदस्यत्व घेणाऱ्यालाच प्रवेश असतो. आधी सदस्यत्व (Sign Up) घ्यायचे व त्यांनतर Log In करून प्रवेश घेतला तरच वेबसाईटवरील मजकूर वाचता येतो. अन्यथा वाचता येत नाही. उदा. फेसबुक, ट्विटर वगैरे. याउलट काही साईटवर सदस्यत्व न घेताही मजकूर वाचण्याची मुभा असते. मात्र लेखन करायचे असेल किंवा प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर सदस्यत्व घेऊन लॉगिन करणे अनिवार्य असते. सदस्यत्व घेणे/रजिस्ट्रेशन/नोंदणी करणे आणि Sign Up करणे हे समानार्थी शब्द आहेत. वेगवेगळ्या साईटवर यापैकी वेगवेगळे शब्द वापरले जातात.
४)
"नवीन खाते बनवा" यावर क्लिक करा.
५)
सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे. लॉगीन करताना सदस्यनाम/Username ची दरवेळेस गरज पडणार असल्याने आपला सदस्यनाम/Username आयडी व्यवस्थित लक्षात ठेवावा.
६)
ईमेल (विरोप पत्ता) बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
७)
सदस्याचे पूर्ण नाव या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
८)
लिंग एक योग्य पर्याय निवडा.
९) फॉर्ममधील अन्य रकान्यात इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)
***
CAPTCHA या विभागात एक चित्र दिसेल. त्यावरील मजकूर ओळखून खालील रकान्यात जसाच्या तसा मजकूर लिहा. किंवा समोरील चौकोनात क्लिक करा. त्यांनतर जे चित्र येईल, त्या चित्रात दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रतिमांवर क्लिक करा किंवा गणित आल्यास गणित सोडवा.
***
सर्वात खाली .नवीन खाते बनवा.. असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
टप्पा -२
आपण दिलेल्या E-Mail वर आपणास एक ईमेल येईल.
ईमेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल. त्या दोन्ही रकान्यात आपला नवीन हवा तसा पासवर्ड घाला. पासवर्ड शक्यतो कमीत कमी ८ अक्षरी/अंकी असावा.
***
टप्पा -३
आता आपण आपले सदस्यनाम/Username व Password वरून Log In/ Sign In करून प्रवेश घेऊ शकता.
बघुयात की कोण-कोण बळीराजा डॉट कॉमवर सदस्यत्व घेतात. त्यावरून मला कळेल की कोण कोण शिकण्यास उत्सुक आहे आणि या कार्यशाळेचा किती उपयोग होत आहे.
प्रतिक्रिया
लेखन स्पर्धा
Sir, मार्गदर्शनाबद्दल thank you.
आभार
आभार
पाने