नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले
दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले
पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले
मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले
का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले
कसला ‘अभय’ कवी तू? रचलेस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!
- गंगाधर मुटे
--------------------------------------------
प्रतिक्रिया
फेसबूक वरिल प्रतिसाद
फेसबूक वरिल प्रतिसाद
Asawari Kelkar-Waikar कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
wahhhhhh............
Ulhas Ramchandra Bhide Chaan...... पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले ha sher sarwadhik aawadalaa.
Shridhar Jahagirdar bahot khub..
Prabha Prabhudesai sundar !
Prashant Panwelkar Chhan
Ramesh Thombre Sunder surekh ★
Anuja Mulay wwahaaa .......kay surekh aahe .....apratim
----------------------------------------------------------------
मिसळपाव वरिल प्रतिसाद
गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे.
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले
सुरेख मुटे साहेब. सुरेख. गझल
गझल आवडली.
मस्त गझल!! तालात म्हणताना
जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा
मुटे साहेब, हम्म ! एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे ! क्या बात है !
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
हा कबीराचा संदेशच वाटतो, व्वा क्लास !
कधीतरी यायला हरकत नाही पण अशाच जमलेल्या कविता घेउन या !
धन्यवाद !
पुकशु
अप्रतिम! सर्वांग सुंदर! एकेक
सर्वांग सुंदर! एकेक कडवे गोड झाले आहे
+१
+२
वा...वा..वा..! मुटे
+१
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणालेक्या बात है! वा!!
अप्रतिम
मी मराठीवरील प्रतिसाद
गंगाधरजी खुप सुंदर आहे कविता
अनिल तापकीर यांनी गुरू, 19/04/2012 - 19:16 ह्यावेळी प्रकाशित केले.
अप्रतिम
रमताराम यांनी गुरू, 19/04/2012 - 19:55 ह्यावेळी प्रकाशित केले.
कुर्निसात मालक. तुम्ही वरचेवर येत रहा मालक. आमचे कवितेशी नाते घट्ट होते राहते.
तुमच्या कवितेचा दुवा आमच्या सहीत डकवण्यात आला आहे. दीर्घकाळपर्यंत आमच्या - नि इतरांच्याही - नजरेसमोर रहावी अशी गजल.
-----------------------------------------
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
-----------------------------------------
कविता आवडली !
निवेदिता जैन यांनी गुरू, 19/04/2012 - 20:49 ह्यावेळी प्रकाशित केले.
कविता आवडली !
अतिशय सुंदर गझल..खूप आवडली..
स्वामी संकेतानंद यांनी गुरू, 19/04/2012 - 21:09 ह्यावेळी प्रकाशित केले.
अतिशय सुंदर गझल..खूप आवडली..
अप्रतिम!!! सुरेख!!!!!!!!
राजे यांनी गुरू, 19/04/2012 - 22:19 ह्यावेळी प्रकाशित केले.
अप्रतिम!!!
सुरेख!!!!!!!!
केवळ अप्रतिम!!!!!!!!
परिजा यांनी शुक्र, 20/04/2012 - 07:17 ह्यावेळी प्रकाशित केले.
केवळ अप्रतिम!!!!!!!!
परिजा
******
मी मराठीवरील प्रतिसाद
विशाल कुलकर्णी यांनी शुक्र, 20/04/2012 - 19:52 ह्यावेळी प्रकाशित केले.
मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले
का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले>>>>>>.. हे शेर खुप आवडले.
मतला अफाट ! धन्स अ लॉट मुटेदादा
मी मराठीवरील प्रतिसाद
धुंद रवी यांनी शनी, 21/04/2012 - 10:40 ह्यावेळी प्रकाशित केले.
हरेक शेर लाजवाब...
---------------------------------------------------------------------------
क्या बात ........... निव्वळ
Unique Poet यांनी शनी, 21/04/2012 - 16:20 ह्यावेळी प्रकाशित केले.
क्या बात ........... निव्वळ अप्रतिम...खूप आवडली !
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
प्रद्युम्नसंतु
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1978088678882477
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप