नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मी मेल्यावर....!
मी मेल्यावर घरात,एकटे वाटणार आहे..!
आठवणींचे मनात,धुके दाटणार आहे..!
रीचवशील तरी तू,किती आसंवाना..?
पुन्हा डोळ्यात ती,ढगे साठणार आहे..!
उसळली ही तुरपाई,विश्वासाची माझ्या..,
आता या काळजाचे,पडदे फाटणार आहे..!
शासन दरबारी जरी,ती बंद सावकारी..,
दलाल तरी मौतीचे,धंदे थाटणार आहे..!
इथं बळीराज्य येण्या,बळीच बळी जाते..,
कुठवर मीच फाशीचे,फंदे चाटणार आहे..?
पिकही ते बटईचे,माझे डुंगीत रुसले..,
मग आयुष्यही किती,मक्ते काटणार आहे..?
गुरांस खायला नाही,या धुऱ्यास चारा..,
यंदा भाऱ्यात माझे,मुंडके छाटणार आहे..!
रमेश बुरबुरे,
मु.निंबर्डा,पो.शिरोली
ता.घाटंजी,जि.यवतमाळ
पिन कोड ४४५३०१
मोबाईल क्र.९७६७७०५१७०
ईमेल-burbureramesh@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
किचकट प्रकिया
श्री बुरबुरेजी ,
जमले एकदाचे कविता संकेतस्थळावर प्रकाशित करणे.
तुम्हाला प्रारंभी ही प्रक्रिया किचकट वाटली असली तरी ही प्रकिया तशी मुळीच किचकट नाही. कोणताही विषय अथवा प्रक्रिया आपल्याला माहिती नसल्याने किचकट वाटत असते. एकदा माहित झाली की तीच प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ होऊन जाते.
बदल्या काळात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाल्याने हा विषय समजून घेणे आणि शिकून घेणेही महत्वाचे आहेच.
असो, आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शेतकरी तितुका एक एक!
आभार
सर, मी घाबरलो होतो व या दुनियेशी नवखा ही..माझ्या मित्राने मला याबाबतीत सांगीतले होते.४ दिवस शिल्लक होते मी घाबरलो होतो की माझी कविता जायला पाहिजे.
मी एकच महिना झालाय लिहितोय..या आधी गंधही नव्हता कवितेचा म्हणुन या लिखानाला काय म्हणु कळेना.मग १ शब्द सुचला गझलनुमा म्हणजेच गझल सदृश्य असल्याने तिला गझल म्हणु की कविता म्हणु पार तारांबळ उडाली होती.apps Download केला रात्रीचे २.३ड वाजुन गेले मग तरीही जमलं नव्हतं मला झोप लागली नाही.की आपण एवढे मागास कसे आहोत या संगणाकाच्या दुनियेत हाच विचार मला खायला लागला.पण दुसऱ्या दिवशी परत भिडलो तेव्हा कुठे सादर करता आली.सर्व Admin Team चे धन्यवाद सहकार्यासाठी....!
स्पर्धेत वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा अगदिच अमुल्य ठेवा माझ्यासाठी...
खुप खुप धन्यवाद
R.A.Burbure
खूप छान प्रयत्न सर
खूप छान प्रयत्न सर
गझलनुमा आवडली
धन्यवाद ताई
मी १,२ महिने झाले लिहितोय....गझल नाही जमत मला पण यमक जुळवतो म्हणुन लोक गैरसमज करतात...म्हणुन मीच स्वता गझलनुमा/गझलसदृश्य म्हणुन सुटका करुन घेतो.
R.A.Burbure
मी मेल्यावर
पिकही ते बटईचे, माझे डुंगीत रुसल्या..
मग आयुष्यही किती, हप्ते काटणार आहे..
अप्रतिम रचना बुरबुरे सर
मनस्वी धन्यवाद साहेब.
आपल्या अमुल्य अभिप्रायाचा सदैव रुणी..राहील.धन्यवाद.
R.A.Burbure
मी मेल्यावर
पिकही ते बटईचे, माझे डुंगीत रुसल्या..
मग आयुष्यही किती, हप्ते काटणार आहे..
अप्रतिम रचना बुरबुरे सर
अतिशय छान लिहीली आहे कविता
अतिशय छान लिहीली आहे कविता .अस वाटत नाही की फक्त दोन महिन्यापासूनच लिहीता.पुढील कवितालेखनास शुभेच्छा
अतिशय छान लिहीली आहे कविता
अतिशय छान लिहीली आहे कविता .अस वाटत नाही की फक्त दोन महिन्यापासूनच लिहीता.पुढील कवितालेखनास शुभेच्छा
अतिशय छान लिहीली आहे कविता
अतिशय छान लिहीली आहे कविता .अस वाटत नाही की फक्त दोन महिन्यापासूनच लिहीता.पुढील कवितालेखनास शुभेच्छा
आभार
पण ऊरात ३२ वर्षाचा झंझावात शेष होता कदाचित तो एक स्वानुभव,शेतकरी गरीब घराण्यात जन्म,भोगावे लागलेले चटके,शिक्षणासाठी भटकंती,हे सर्व आंतरत्वाचे आतडे,उपसलेले कातडे बोलताहेत सर...!
त्यामुळे कदाचित या अनुभवाची झालर मला निसर्गदत्त मिळाली असेल.
अमुल्य मतासाठी खुप खुप धन्यवाद साहेब..!
R.A.Burbure
मी मेल्यावर
छान कविता बुरबुरेजी!
Dr. Ravipal Bharshankar
आभार
खुप खुप आभार साहेब.
R.A.Burbure
ऑनलाइन नोंदणी केली
प्रिय मुटे सर...
मी ऑनलाइन नोंदणी केली.परत आपणास त्रास दिला अडचण आल्यामुळे त्याबद्दल दिलगीर आहे
R.A.Burbure
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण