Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 1:44 PM IST, Mon November 16, 2026

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त (१२ डिसेंबर २०२६)  
सादर करीत आहोत.....
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन
प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी
१६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ 
 
या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०२६, पद्यलेखन स्पर्धा-२०२६, अनुभवकथन स्पर्धा-२०२६ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२६
  1.  गद्यलेखन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध
  2.  पद्यलेखन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) छंदोबद्ध कविता  ड) गझल   इ) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
  3. अनुभवकथन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) शेतकरी जीवनातील सुखद अनुभव ब) शेतकरी जीवनातील दुःखद अनुभव
  4. समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण ब) शेतीविषयक ललित लेखांचे समीक्षण क) ग्रामीण कवितेचे रसग्रहण 

    (समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे.)

प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे :
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
  • पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
  • एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल आणि विजेत्या रचना संमेलनाच्या विशेषांकात प्रकाशित केल्या जातील.

निकाल : निकाल १२ डिसेंबर २०२६ रोजी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या https://baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण : नियोजित १६ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत, याची आवर्जून नोंद घ्यावी. मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
 
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
 
  1. स्पर्धा १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
  2. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. ONLINE लेखन करण्यासाठीलेखन करा  https://baliraja.com/node/add/lekhan_spardha  या लिंकवर किंवा उजव्या बाजूच्या हिरव्या "लेखन करा" बटणवर क्लिक करा.
  3. स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका येथे baliraja.com/spardha-2026 या लिंकवर पाहता येतील.
  4. लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे?  याबद्दल https://baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
  5. स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
  6. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- लेखनप्रकाराचा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील/विदेशातील पोस्टाचा निवासी पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
  7. सदर स्पर्धा वैश्विक स्तरावर सर्व मराठी भाषिकांसाठी खुली आहे.
  8. स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
  9. परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी/स्पर्धा व्यवस्थापक/स्पर्धा आयोजक/स्पर्धा संयोजक सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  10. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
  11. गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
  12. गझलेमध्ये किमान १ शेर तरी शेती/महिला/ग्रामीण जीवन विषयाशी निगडीत असावा अशी अपेक्षा आहे मात्र अनिवार्य किंवा बंधनकारक नाही. 
नियम व शर्ती :
 
  1. स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  2. स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  3. स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
  4. एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. (उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.)
  5. परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. (परीक्षक मंडळात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार, शेतकरी, कामगार, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असेल.) सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
  6. सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
  7. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  8. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  9. निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  10. पारितोषिक स्वीकारायला अनेकदा काही विजेते स्वतः किंवा प्रतिनिधी उपस्थित राहात नाही त्यामुळे सन्मानचिन्ह बनवण्याचा खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे संमेलनाची प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे. 
  11. शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
 
आपले स्नेहांकित : संयोजक मंडळ
 
  • गंगाधर मुटे 
  • जयश्री कोटगीरवार (वर्धा) 
  • राजेंद्र फंड (अहिल्यानगर)
  • मुक्तविहारी (बीड)
  • निशा काळे (वर्धा) 
*  *  *
  • अधिक माहितीसाठी साहित्य चळवळ किंवा फेसबुक गृप येथे भेट द्या.
*  *  *
16sss
१६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
शेतकरी साहित्य संमेलन
शेतकरी
मराठी साहित्य संमेलन
मराठी शेतकरी साहित्य संमेलन
शेतकरी साहित्य चळवळ
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 389 views

Comments (2)

वैचारिक लेखाचा विषय दिलेला…

Ajit1980

बुधवार, November 18, 2026 - 11:44
Permalink
New

वैचारिक लेखाचा विषय दिलेला नाही.कृपया तो द्यावा ही नम्र विनंती

  • Log in or register to post comments
लेखनाचा विषय : शेती/महिला…

admin

बुधवार, November 18, 2026 - 14:48
Permalink
New

लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन या तीन पैकी एक कोणताही

  • Log in or register to post comments

In reply to वैचारिक लेखाचा विषय दिलेला… by Ajit1980

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 12 *
Who's new नवीन सदस्य
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18
  • Gauspasha Shaikh
  • anil Sanap

Recent comments ताजे प्रतिसाद

  • लेखनाचा विषय : शेती/महिला…
    55 minutes ago
  • अत्यंत हृदयाला भिडणारे आणि मातीशी घट्ट नाळ जोडणारे
    2 hours 36 minutes ago
  • वैचारिक लेखाचा विषय दिलेला…
    3 hours 59 minutes ago
  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    16 hours 39 minutes ago
  • धन्यवाद
    3 days 23 hours ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ