पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रखरखणाऱ्या प्रखर उन्हावर गझल लिहीतो आहे शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे
ज्या प्रश्नाने बळी घेतला माझ्या शेतकऱ्याचा त्या जगण्यावर...त्या प्रश्नावर गझल लिहीतो आहे
ताटामधला काढुन ज्याने घास जगाला दिधला त्या कर्णाच्या दातृत्त्वावर गझल लिहीतो आहे
मातीमध्ये जीव पेरुनी देश पिकवला ज्याने त्यास मिळालेल्या फासावर गझल लिहीतो आहे
या हृदयाला हाय लागते इतकी लिहिताना की असे वाटते..तप्त तव्यावर गझल लिहीतो आहे
शेतीवर, मातीवर अगदी त्याच्यावरही लिहिले आता मी त्याच्या मरणावर गझल लिहीतो आहे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.