
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल!
सद्यस्थितीत ज्याला विज्ञान म्हटले जाते त्या विज्ञानाच्या संशोधनानुसार अंतराळात हजारो ग्रह आहेत, त्यापैकी काही पृथ्वी सारखे आहेत, त्या ग्रहावर सुद्धा पृथ्वी सारखीच सजीव सृष्टी असू शकते वगैरे गृहीतके मांडली जातात.
माझ्या मते ही विज्ञानाच्या नावाखाली अज्ञानाची गृहितके मांडली जातात ज्यात कुठेही विज्ञान नसून केवळ मनाचे मनोरे आणि मानवी संकल्पना असतात.
कर्ता करविता जन्मदाता देव आहे आणि तोच संबंध सृष्टीचा निर्माता आहे ही संकल्पना 100% मान्य केली तरच अन्य ग्रहावर सुद्धा आपल्यासारखीच सजीव सृष्टी असू शकते, असे मान्य करता येते किंवा तशी कल्पना करता येते.
कर्ता करविता कुणीच नसेल, सबंध ब्रम्हांडाचा निर्माता एकच नसेल तर पृथ्वी सारखी समान किंवा मिळतीजुळती सजीव सृष्टी अन्य ग्रहावर असण्याचे काहीच कारण उरत नाहीत.
कोणत्याही ग्रहाची म्हणजे अन्य ग्रहाची निर्मिती कशी झाली. तिथे सजीवाचा जन्म कसा झाला, त्यानंतर त्याची उत्क्रांती कशी होत गेली यावर सर्व तिथली सजीव सृष्टी अवलंबून असेल. पृथ्वी वरील मानव जाती सारखी किंवा पृथ्वीवरील पशुपक्ष्यासारखी असण्याची एक टक्का शक्यता सुद्धा उरत नाही.
अन्य ग्रहावर सजीव सृष्टी नक्की असेल पण ती आपल्यापेक्षा म्हणजेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीपेक्षा 100% पूर्णतः वेगळी असेल.
उदाहरणार्थ...
कदाचित तिथल्या सजीव मनुष्य सदृश्य व्यक्तीची उंची 100 फूट,200 फूट, 500 फूट किंवा हजारो फुटही असू शकेल.
तो एकतर बोलतच नसेल किंवा बोलत असेल तर तोंडानेच बोलेल अशीही शक्यता उरत नाही.
बघतच असेल असेही नाही किंवा बघत असेल तर डोळे असेल असेही नाही किंवा डोळे असेल तर दोनच असेल असेही नाही कदाचित हजारो डोळे त्याला असू शकतात.
माणसाने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार जशी देवाची निर्मिती केली तसेच माणूस आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार अन्य ग्रहाबद्दल कल्पना करू शकतो.
- गंगाधर मुटे #शुभरात्री_लोक्सहो