नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अगदी साधे व दैनंदिन जीवनातील शब्द पण उत्कट भावाविष्काराने ओघवते आल्याने वाचकांच्या थेट हृदयाला जाऊन भिडतात. बुलढाना जिल्ह्यातील कवी स्व. प्रा.स.ग.पाचपोळ यांची ही कविता. त्यांच्या कवितेवर वर्हाडी भाषेचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. त्यांची ही कविता लाक्षणीक दृष्ट्या खूप गाजली नसली तरी त्या तुलनेने मात्र जनमानसात खूप रुजलेली आहे. लोकांनी स्विकारल्यामुळे ह्या कवितेला "लोकमान्यता" प्राप्त होऊन जनमाणसाच्या ओठी रुळलेली आहे.
हंबरून वासराले
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय
आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय
बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय
काट्याकुट्या येचायाले जाये माय राणी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानतं नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय
माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय
कवी - स्व. प्रा.स.ग.पाचपोळ
काव्यवाचन - विजय विल्हेकर
--------------
काव्यवाचन ऐकण्यासाठी क्लिक करा.
-------------
--------------
प्रतिक्रिया
खुप सुन्दर!!!!
खुप सुन्दर!!!!
कवितेचा इतिहास
कवी स्व. प्रा.स.ग.पाचपोळ हे बुलढाना जिल्ह्यातील. त्यांच्या कवितेवर वर्हाडी भाषेचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. त्यांची ही कविता लाक्षणीक दृष्ट्या खूप गाजली नसली तरी त्या तुलनेने मात्र जनमानसात खूप रुजलेली आहे. लोकांनी स्विकारल्यामुळे ह्या कवितेला "लोकमान्यता" प्राप्त होऊन जनमाणसाच्या ओठी रुळलेली आहे.
मुंबई येथील एका पोलीस खात्याच्या कार्यक्रमात जेव्हा ही कविता जितेंद्र जोशींनी सादर केली तेव्हा या कवितेचा कवी म्हणून नारायण सुर्वेंचा उल्लेख केला. हा कार्यक्रम टीव्हीवर पाहणार्यांना ही बाब पचनी पडण्यासारखी नव्हतीच. ही कविता जर नारायण सुर्वेंची असेल तर प्रा.स.ग.पाचपोळ हे साहित्यचोर ठरण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब अनेकांच्या जिव्हाग्री लागली. शिवाय प्रा.स.ग.पाचपोळ यांना डावलून चक्क नारायण सुर्वेंचे नाव घेणे हेही अनाकलणीय होतेच.
अमर हबिब, विजय विल्हेकर यांनी यासंदर्भात खोलवर चौकशी करून पुरावे गोळा करणे सुरू केले.
बुलढाण्याचेच कवी श्री लांजेवार यांनीही पुरेशी माहिती/पुरावे गोळा करून या संदर्भात लोकमतच्या आवृत्तीत एक लेख लिहून ही कविता स्व. प्रा.स.ग.पाचपोळ यांचीच आहे, हे ठासून मांडले.
जितेंद्र जोशी काहीही म्हणत असले तरी खुद्द श्री नारायण सुर्वेंनी या कवितेवर आपला दावा कधीही सांगीतला नाही, अशी माझी माहीती आहे.
शेतकरी तितुका एक एक!
कविता
अप्रतिम
Youtube Link
Youtube Link
कवी - स्व. प्रा.स.ग.पाचपोळ
काव्यवाचन - विजय विल्हेकर
https://youtu.be/Myz16KQrY7s
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण