Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन

छत्रपती शिवाजी महाराजमहाबळेश्वर संमेलन sharad Joshi

|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने | 
रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने || 
|| जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा | 
द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||

व्योमव्यापी फाऊंडेशन आणि शेती अर्थ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर
दिनांक : शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६  
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, स्वराज्य मुकुटमणी प्रतापगड परीसर, दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा  

-=- कार्यक्रमपत्रिका -=-
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर, दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा येथे दोन दिवसीय १४ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
: कार्यक्रमाची रुपरेषा :
शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ 
 
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अल्पोपहार
सकाळी १०.३० ते ११.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी ११.०० ते १२.०० : ग्रंथ दिंडी
दुपारी १२.०० ते १.०० : भोजन

दुपारी ०१.०० ते ३.०० : उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, ज्येष्ठ शेतीसाहित्य अभ्यासक व समीक्षक, लातूर 
उदघाटक :   मा. किसन शेठ भिलारे, प्रगतशील शेतकरी  
प्रमुख पाहुणे : मा. डॉ. तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ शेती साहित्यिक
सन्माननीय अतिथी : मा. डॉ. सुरेश मोहितकर, माजी प्राचार्य, चंद्रपूर
स्वागताध्यक्ष : मा. चंद्रलेखा बेलसरे, ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका
संयोजक : मा. प्रमोदकुमार बेलसरे, डायरेक्टर, इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि.
समन्वयक : मा. राजकुंवर बेलसरे (सातारा)
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ, वर्धा 
आयोजक : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट, मुंबई 
सूत्रसंचालन : मा. योगिता खांडेभराड, शेतकरी नेत्या, जालना 
 
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी
 
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
वाद्यवृंद : ज्ञानेश पोहाणे 
गायक :  विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे
 
सत्र - २  : दुपारी ०३.०० ते ०३.४० : परिसंवाद - १ 
विषय : तंत्रज्ञानाच्या कसोटीवर शेती उत्थानाची दिशा
 
अध्यक्ष : मा. प्रमोदकुमार बेलसरे (सातारा)
सहभाग : , मा. डॉ. उपेंद्र महात्मे (नागपूर) 

सत्र - ३ : दुपारी ०३.४० ते ०४.३० : शेतकरी कवी संमेलन - १ 
 
अध्यक्ष : मा. माधुरी इंगळे (बुलढाणा)
सूत्रसंचालन : मा. अजित सपकाळ (अकोला)
सहभाग : मा. साहेबराव तायडे (अकोला) मा. विनायक अंगाईतकर (अमरावती) मा. राजेंद्र फंड (अहिल्यानगर), मा. एम.ए.रहीम 'बंदी' (चंद्रपूर) मा. साईनाथ रहाटकर (नांदेड), मा. कमलकिशोर अग्रवाल (परभणी), मा. लक्ष्मण शिंदे (पुणे) मा. अनंत मुंडे, मा. नागनाथ बडे (बीड), मा.भालचंद्र डंभे (वर्धा), मा. लक्ष्मण गायकवाड (हिंगोली), मा. बालाजी राजूरकर, मा. वासुदेव पडवे, मा. संगीता गडवार (वर्धा), मा. यामीनी मडावी (गडचिरोली), मा. राजाभाऊ अंगाईतकर (यवतमाळ), मा. संदीप झरेकर (लातूर)

दुपारी ०४.३० ते ५.०० : चहापान
सत्र - ४ : दुपारी ०५.०० ते ०६.२० : शेतकरी कवी संमेलन - २  
 
अध्यक्ष : मा. सुरेखा बोरकर (नागपूर)
सूत्रसंचालन : मा. सुनील बावणे - नील (चंद्रपुर)
सहभाग : मा. संजय कावरे (अकोला) मा. मुरलीधर नाईक, मा. खुशाल गुल्हाने (अमरावती) मा. मालती सेमले (गडचिरोली) मा. प्रदीप देशमुख, मा. गजानन माद्यसवार (चंद्रपूर) मा. रवींद्र दळवी (नाशिक), मा. किशोर देशमुख (परभणी), मा. रजनी ताजणे (पालघर) मा. सुवर्णा वाघमारे (पुणे) मा. बालाजी कांबळे, मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. संजय आघाव (बीड) मा. अनिता खेबूडकर (बेळगांव), मा. रिता जाधव (मुंबई), मा. रंगनाथ तालवटकर, मा. सुरेश सुरजूसे, मा. नारायण निखाते (वर्धा), मा. अशोक गुठठे (हिंगोली), मा. देविदास सौदागर (धाराशिव), मा. हणमंत पवार (लातूर) 
 
 
सत्र - ५ : दुपारी ०६.२० ते ७.०० : कथाकथन

अध्यक्ष : मा. सु.पुं.अढाऊकर (मुंबई)
सहभाग : मा. बाळासाहेब देशमुख (अहिल्यानगर)

सत्र - ६ : रात्री ०७.०० ते ८.०० : सांस्कृतिक कार्यक्रम
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत
 
“सह्याद्रीची शौर्यगाथा”
(पारंपारिक जागरण, गोंधळ)

संगीत संचालक : मा. बिपीन वर्तक व सहकारी

निवेदिका : मा. विद्या बोरुळकर 
संकल्पना व निर्मिती : मा. सतीश बोरुळकर
************
 

रात्री ०८.३० ते ९.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन 

 
=-=-=-=-=-=-=
रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६
 
सकाळी ०८.०० ते ०८.३०  : अल्पोपहार 
 
सत्र - ७ : सकाळी ९.०० ते १०.०० : परिसंवाद - २
विषय : शेती आणि संतवाङ्मय
 
अध्यक्ष : मा. डॉ. हंसराज जाधव (छत्रपती संभाजीनगर)
बीजभाषण : मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सूत्रसंचालन : मा. रमेश खांडेभराड, शेतकरी नेते, जालना
सहभाग : मा. डॉ. कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर), मा. डॉ संजय जगताप (नांदेड), मा. डॉ. पुरूषोत्तम जुन्ने, मा. डॉ. मारोती घुगे (जालना)
 

सत्र - ८ : सकाळी १०.०० ते ११.००  : शेतकरी गझल मुशायरा

 
अध्यक्ष : मा. नंदकिशोर ठोंबरे (नाशिक)
सूत्रसंचालन : मा. विरेन्द्र बेडसे (धुळे), मा. रवी चापके (यवतमाळ)
सहभाग : मा. प्रा.चित्रा कहाते (नागपूर), मा. अजित सपकाळ (अकोला), मा. सतीश माळवे (अमरावती), मा. सुनील बावणे - नील (चंद्रपुर), मा. बाळासाहेब गिरी, मा. गोरख पालवे (नाशिक), मा. दिवाकर जोशी (बीड), मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. योगिराज माने (लातूर)
 
सकाळी ११.०० ते ११.३० : चहापान
 
समारोपीय सत्र : सकाळी ११.३० ते १.०० 
 
अध्यक्ष : मा. फरझाना इकबाल डांगे, साहित्यिका तथा माजी सदस्य, म. रा. मराठी भाषा साहित्य व संस्कृती मंडळ 
प्रमुख अतिथी : मा. दिलीप भोयर, शेतकरी नेते, अमरावती 
प्रमुख उपस्थिती : मा.प्रमोदकुमार बेलसरे डायरेक्टर, इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि
सूत्रसंचालन : मा. बालाजी कांबळे (बीड)
 
शेतकऱ्यांच्या गर्जन गीताने समारोप

दुपारी  ०१.०० ते ०१.३०  : प्रतिनिधी स्नेहभोजन 

=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=
 
आयोजन समिती
 
स्वागताध्यक्ष : मा. चंद्रलेखा बेलसरे
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे
संयोजक : मा. प्रमोदकुमार बेलसरे
आयोजक : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर
आयोजन समिती : मा. राजकुंवर बेलसरे (सातारा), मा.दिलीप भोयर (अमरावती)
नियोजन समिती :  मा. प्रतिभा काळे, सचिव, शेती अर्थ प्रबोधिनी (वर्धा)
स्वागत समिती : मा. संतोष निकम (सातारा), मा.राजेंद्र फंड (अहिल्यानगर)
व्यवस्थापन समिती : मा. विनोद काळे, शिवम मुटे (वर्धा) 
सभागृह व्यवस्था समिती : मा. गणेश मुटे (वर्धा)
स्वागत कक्ष समिती : मा. सारंग दरणे, विवेक मुटे (वर्धा)
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=
: मार्गदर्शक :
मा. सरोजताई काशीकर 
मा. अ‍ॅड वामनराव चटप 
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=

Ad प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना  Ad
https://www.baliraja.com/node/3351

Ad महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे  Ad
https://www.baliraja.com/node/3292

Ad कार्यक्रमपत्रिका Ad
https://baliraja.com/kp14

Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad
https://baliraja.com/rep-regd

Ad  नियोजन  Ad
https://baliraja.com/14-Ni
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/01/2026 - 21:24. वाजता प्रकाशित केले.
    प्रति,
    मा. गंगाधरजी मुटे
    १४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर 
     
    सप्रेम नमस्कार,
       आपण २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथे संपन्न होणाऱ्या १४ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, त्याबद्दल व्यक्तिशः आपले व संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी धन्यवाद. ह्या गौरवाचा मी सानंद स्वीकार करतो. हा सन्मान स्वीकारताना मला निश्चितच आनंद होतोय. हे संमेलन एका वैचारिक बांधिलकीतून, भूमिकेतून जन्माला आलंय. ते अनेक लिहित्या हातांना लिहिण्यास, व्यक्त होण्यास प्रेरित करतेय, ही गोष्ट मला खूप थोर वाटते. ह्या चळवळीशी, संमेलनाशी आरंभापासून मला जोडता आलं, ह्याचा आनंद व अभिमान वाटतो. सोबतच ह्या विचारपीठावर आपल्या सर्वांना डोळस भूमिका देणारे, शेतकऱ्यांचे पंचप्राण आदरणीय शरद जोशींनी पहिल्यांदा अध्यक्षपद भूषविले असल्याने मनात एक प्रकारचं आदरयुक्त दडपण आहे. साहित्य चळवळीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचा विचार प्रवाहित करणारे अनेक महत्वाचे साहित्यिक, समीक्षक ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. ही परंपरा खूप समृद्ध, उज्वल अशी आहे. ह्या उज्वल परंपरेचं निश्चित असं 'भान' मला आहे. अशा एका महत्त्वाच्या विचारपीठावर राबत्या शेतकऱ्याचा, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मुलगा म्हणून अनुभवलेलं भावविश्व व्यक्त करताना आनंद वाटेल. शेतकरी चळवळीचा, साहित्याचा अभ्यासक, समीक्षक म्हणून शेती, शेतकरी चिंतन मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. यशस्वी संमेलनाच्या आयोजनास खूप साऱ्या मनस्वी शुभेच्छा !
     
    प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, 
    लातूर.
    *********
    मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, 
    लातूर

    सप्रेम नमस्कार,
    आपण आमच्या विनंतीला मान देऊन संमेलनाध्यक्षपदाचा स्वीकार केला याबद्दल अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार! 
     
    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने