१६ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा - २०२६
शेतकरी गझल लेखन स्पर्धेसाठी
वृत्त - शुभगंगा
मात्रा - ८/८/६
अकाल पडेल
संपच झाला यदा कदाचित दाण्याचा
या धरतीवर अकाल पडेल खाण्याचा
मोल भाव का करता मेथी चवळीचा ?
भाव वाढला असून तुमच्या नाण्याचा
शेतकऱ्यांच्या डोळ्यामधुनी गळण्याला
उरला नाही आज भरवसा पाण्याचा
उभ्या पिकांची किंमत असते कवडीची
भाव वधरतो हात लागता वाण्याचा
कुडव पायली गोणा पोते कणग्यांचा
काळ परतुनी यावा अदल्या आण्याचा
कधीच नाही चुकला रस्ता शेतकरी
सराव तळव्याला शेतावर जाण्याचा
शेतकऱ्यांचे दुखणे मांडत नसेल तर
काय फायदा गझला कविता गाण्याचा
✍️
सुनील बावणे - निल
वायगांव (तु.) भद्रावती
जिल्हा - चंद्रपूर
८३०८३३४१२३

प्रतिसाद (1)
छान रचना
RANGNATH TALWATKAR
छान रचना