नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आमच्याकडे बोलताना-लिहिताना “मला जाग आला” असे म्हणतात. मी पण तसेच म्हणतोय.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गावंढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
आणि.............. शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
"करू जाता काय, उलटे झाले पाय" म्हणतात ते यालाच. आहे ना गंमत?
- गंगाधर मुटे
...........................................................
भाषेच्या गमती-जमती : भाग-१
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2237117089646300
शेतकरी तितुका एक एक!