![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रकाशात शिरायासाठी
ओढते रात, अमावास, फ़िरायासाठी
दे जरा हात, प्रकाशात, शिरायासाठी
काढली स्वत्व, बघायास, स्वत:ची सेल्फ़ी?
टाक फाडून, अहंभाव, जिरायासाठी
तुला दिसणार, कशा सांग, सुगंधी जखमा?
तूच ये आज, उभे हृदय, चिरायासाठी
ही कडा सर्द, तरी गर्द, फुलांची वस्ती
ठाकते ताठ, तुफानास, विरायासाठी
तामसी ताज, दगाबाज, निघाला म्हणुनी
काढतो रोज, अभय पोट, किरायासाठी
- गंगाधर मुटे 'अभय'
-----------------------------
प्रतिक्रिया
प्रकाशात शिरायासाठी
झिजतो कष्टतो अभय, कास्तकाराच्या उद्धारासाठी
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
पाने