नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*हिशोब*
नर्स,डाक्टर,स्वीपर
करताहे सेवा खरी,
पन खासाठी त्यायिले
कोन पाठवे भाकरी ?
नाही कुथूनही घेत
कोनी किसानाच्या नावा,
सांगा पिकवून थोही
नाही करत का सेवा ?
कर्ज काढुनि करतो
बीज पेरनी शेतात,
करे धरतीची सेवा
राब राबुनि मातीत.
घाम पेऊन धरनी
जवा होई धन्य धन्य,
देई पिकाच्या रुपानं
भरपूर अन्नधान्य.
थेच खाऊनिया सारे
सेवा राह्यले करून,
फळं भाजीपाला कंदं
काय पडले वरून ?
द्राक्ष, संतरं,टमाटे
सल्ले टर्बुजं-खर्बुजं,
नाही इचारलं कोनं
जरा वाटली ना लाज !
दूध अमृतासारखं
किती फेकावं लागलं !
कायं पिवयं पडून
किती अनाज डागलं !
घरामंधी कापसात
किडे राह्यले भांडून,
करे बायको सैपाक
चूल आंगनी मांडून.
झालं शासन निष्ठुर
नेते येऊन पाहेना,
नाही बियान्याची सोय
सरे वैशाख महिना.
मायबाप सरकार
देवो कर्ज तरी आम्हा,
हाये टपून बसला
दुष्ट सावकार पुन्हा !
टायेबंदीबाद तरी
वाटे खुलावं नशीब,
म्हून आमच्या घामाचा
मीनं मांडला हिशोब !
""""""""""""""""""""""""""""""
खुशाल गुल्हाणे,अमरावती
९४०३०१९७९५
प्रतिक्रिया
टायेबंदीबाद तरी
टायेबंदीबाद तरी
वाटे खुलावं नशीब,
म्हून आमच्या घामाचा
मीनं मांडला हिशोब !
मार्मिक रचना ...शुभेच्छा गुल्हाने सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद सर
धन्यवाद सर
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने