![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
आभाळाचे गूढ बोलले...
आभाळाचे गूढ बोलले
कडाडले अन् शांतही झाले
हात लावूनी भाळी, बघतो
त्याचे रानही ढवळे झाले
त्याचे रानही ढवळे झाले
माह्ये पानही पिवळे झाले
सांगून गेला घरी कुणी तो
म्हणे दुष्काळाचे फाम निघाले
दुष्काळाचे फाम निघाले
उरले सुरले त्राणही गेले
बघतो जर का खारट माझ्या
पाण्याने रान भिजवता आले
पाण्याने रान भिजवता आले
सात डोळे पाण्याने न्हाले
दुष्काळातील फामाच्या पैश्याने
पाणी एकाच डोळा वापस केले ?
पाणी एकाच डोळा वापस केले
बाकी सहा डोळे पाण्याने गेले
अन् वरून म्हणता तुम्ही गड्यांनो
का शेतकरी फासाने मेले ?
नाहीच ते फासाने गेले
दुष्काळाने तर नाहीच गेले
होते ठेवले गहाण म्हणून का
त्या काळ्या मायेला मुक्त केले ?
श्रीधर....
मु. पो. चांदज, ता. जिंतूर जि. परभणी
9767860338
प्रतिक्रिया
If any queries about my this
If any queries about my this poem please tell me on my email id
shridharambhure94@gmail.com
Shridhar
स्पर्धेसंबंधी काही सूचना
स्पर्धेसंबंधी काही सूचना असल्यास http://www.baliraja.com/node/1773 येथे दिल्या जातील. व्यक्तीश: संपर्क करण्यात येणार नाही. कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप