![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
ऋतू रुसला रुसला,एेन श्रावण माथी
विहिरीच्या जाळाची ओली सावली पाठी
पाण्याच्या घागरीत कोरडा अंधार
भेगाळल्या भूईचा हुंदका हूंकार
मायेच्या ओठी काल पावसाची गाणी
पाण्यासाठी कोस जाते उन्हात अनवाणी
भूकेली उदरं जागी रातही झोपता
रिकामी रांजण वाट पाण्याची पाहता
गुरं ढाेरं उपाशी ती सुतकात गोठा
चारापाण्या विना फोडी हंबरडा खोटा
कपटी उन्हानं डाव झळांचा मांडला
तहानेचा टिपूस चिंब डोळ्याने सांडला
नदीच्या काठाला आज संग्राम पेटला
कोण्या बापाचा फांदीला रोज हंगाम टांगला
जीव उडला उडला जगण्यापायी
श्वास हरला हरला पाण्याच्यापायी
- ऋषभ कुलकर्णी.
औरंगाबाद
प्रतिक्रिया
स्वागतम!
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ च्या पहिल्या प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!