नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्यथा
दोन रूपयाच्या कोथिंबीरसाठी
सारा बाजार फिरणारी मंडळी
विचार का करीत नाही?
अरे ,उन्हातान्हात काम करतो
तुम्हांसाठी धान्य पिकवतो
घामातून सोनं पिकते
माञ......
किंमत तेवढी मिळत नसते
कधी विचार केला आमचा?
पिकतं तिथं विकतं म्हणतात
पण .......
सपान आमचं चिरकतं
पतसंस्था देते पैका
तो तरी आमचा झाला का
यंदा काय आेला दुष्काळ
मग काय सुका दुष्काळ
पोटाला आमच्या लागते झळ
दलाली करणारे टाकतात गळ
पोराबाळांचे पाहवत नाही हाल
जमिनी विकल्या पैका घेतला
मॉल, हाटेलात तुम्ही जाता
वस्तूमागं रूपया सोडता
इभ्रतीसाठी टिप भरता
अन् ......
इथं पै पै चा हिशेब करता
तवा सांगतो आया बायांनो
विचार करा तुम्ही विचार करा
कष्टक-यांचा विचार करा
सौ. वीणा अजित माच्छी
पो.घोलवड ,ता. डहाणू
जि.पालघर
पि .नं.४०१७०२
मो .नं.९४२३९२२२२
machhiveena@gmail.com
प्रतिक्रिया
मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :Congrats: :Congrats:
शेतकरी तितुका एक एक!
पाने