Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कारण मला टाळायचं आहे जगणं...

लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

*
'एच.आय.व्ही.' सारखा कुठूनतरी
करतो प्रवेश विषाणू कर्जाचा
करत मैत्री स्वाभिमानाशी
आणि राहतो पोखरत पेशीरचनेला
मातीच्या... आतून

लागू पडत नाही
मात्रा औषधाची कोणत्याही
आजवर संशोधित झालेल्या...

खरं तर केलं पाहिजे लसीकरण
'तरतुदींचं अर्थसंकल्पातील,'
जिथून करतात प्रवेश
विषाणू कर्जाचे
टॉनिक फवरल्याच्या दिमाखात
हवामान आणि बाजारभावाच्या अवहेलनेवर
आणि करतात बाधित
निरोगी जीवनाला
मळ्यापासून खळ्यापर्यंतच्या

आताशा मी-
वाढवू पाहतोय ताकद पेशींची माळमाथ्याच्या
लढण्यासाठी आगंतुक घुसखोरी करू पाहणाऱ्या
परिस्थितीजन्य रोगाशी
कुजण्याआधी मुळं
कारण मला टाळायचं आहे जगणं
मरणाला डिवचणारं
कदाचित बदलूही शकेन मी
बाधित 'डी.एन.ए.'
पेशीत मातीच्या घुसखोरी करून
संरचना बिघडवणारा
जगण्याची...

- रावसाहेब जाधव

Share

प्रतिक्रिया