१६ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा - २०२६
शेतकरी कविता लेखन स्पर्धेसाठी
हिरवा आधुनिक धुरा
शेतकऱ्यांनो, नकारार्थी
विचार आता दूर सारा
वाट पाहतो शेताचा
हिरवा आधुनिक धुरा
टपोर सोनं परत पिकवूया
हिव, तपन झेलून गारा
बंगल्यावानी शोभीत करुया
उन्हाळ मांडव अन् मारा
कडवा कुटार ढेप सरकी
दुपत्याला पोषक चारा
बांधा पुन्हा घट्ट आवळून
हिरव्या गवताचा भारा
शेतकरी तू शेतकरी मी
एकमेकांना होवू सहारा
घोटाळ्यांच्या गर्दीमधुनी
मुक्त करुया सातबारा
असून सोने, चांदी,अदला
अन्ना शिवाय नाही थारा
अख्ख्या जगाचे पोट भरतो
अपुल्या शेतीचाच पसारा
येईल दिवस परतून सुगीचे
घेवुनी जुन्या सुखाच्या धारा
आधुनिकता शोधत येईल
पायवाटेतील बैलांच्या खुरा
खरंच समजला का शेतकरी
निव्वळ कागद करून कारा
सुख दुःख शेतीचे तोच जाणतो
ज्याने,,, ओलांडला... धुरा
✍️
सुनील बावणे - निल
वायगांव (तु.) भद्रावती
जिल्हा चंद्रपूर

प्रतिसाद (1)
छान
RANGNATH TALWATKAR
छान