पूर
जबाबदारीच्या ओझ्याखाली
जगणे अन खितपतणे
हे कसले भयाण वास्तव
पण नाही कसले रडणे ..१
ही कसली विचित्र अवस्था
मी माझाच राहत नाही
संपत नाही रस्ता
वाटही दाखवत नाही ..२
देऊ कशी परीक्षा
घरात पाणीच पाणी
ना आधार राहिले आहे
मग गाऊ कसली गाणी ...३
ओढे नाले भरले
शिवार खरडून गेले
पिके धान्य कुजले
ना पशुधन अता राहिले ..४
या मदतीने माझे
झाले काहीच नाही
पण जगण्याचे बळ मिळाले
बाकी काही नाही ..५
जे काही उरले होते
चिखलानेच भरले होते
पंचनामे करायलाही
कागद कुठे उरले होते ..६
ढग भयाण काळजीचे
माझ्यामधले संपत नाही
ओसरला पूर जरीही
वाहून गेले सर्व काही..७
अजित नरेंद्र सपकाळ
सरस्वती नगर अकोट
जि अकोला
मो 9766201539

प्रतिसाद (1)
छान
RANGNATH TALWATKAR
छान