नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
== भेळ ==
तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ, भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥
घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका
कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका
डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ।
गिर्हाईक चांगलं हेरुन घ्यावं, मुठभर शेव पेरुन घ्यावं
चव नसली तरी चमचा चकचकीत,म्हणुन थोडं सेलेड द्यावं
डिश देण्याआधी पैसे घेऊन,तक्रारीला ठेऊ नये जागा आणि वेळ।
आता ते दिवस र्हायले नाही, गिर्हाईक कमवायची तर बातच नाही
कांदा अन गिर्हाईकं कापायचीच असतात, अशी फिरवावी आपापल्यात वही
फक्त न चुकता लक्ष्मीपुजनाला,पुजेत ठेवावी रोज-मेळ।
चला...आजचा धंदा संपला, पाचशे...तिथं हजारचा गल्ला जमला
भरपुर भरलं ना पोट...?, आत काही का असेना मामला.....
नीतीमत्ता---? सांडलेल्या चुरमुर्यासारखी,लांबुन बघतीये खेळ।
=०=०=०=०=०=०=०=०=०
प्रतिक्रिया
<<कांदा अन गिर्हाईकं
<<कांदा अन गिर्हाईकं कापायचीच असतात, अशी फिरवावी आपापल्यात वही
फक्त न चुकता लक्ष्मीपुजनाला,पुजेत ठेवावी रोज-मेळ।>>
छान कविता.
शेतकरी तितुका एक एक!