नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रती महोदय,
लेखनस्पर्धा-२०१५ साठी माझी प्रवेशिका सदर करतो आहे.
ह्या स्पर्धेसाठी माझ्या छंदमुक्त कविता खालील प्रमाणे
ह्या दोन्ही कविता माझ्या नवीन (अप्रकाशित) काव्य संग्रहामधील आहेत. दोन्ही कवितांचे विषय व कवितांचा आशय शेतकऱ्यांच्या व्यथेशी निगडीत आहे.
ह्या स्पर्धेसाठी त्या पात्र असाव्यात असे वाटते म्हणून सादर करतो आहे. पात्र असतील तर जरूर स्पर्धेत सामील कराव्यात ही विनंती.
१)
|| दुष्काळ ||
असा कसा रे तू दुष्काळ
तूस नाही काही वेळ काळ ||
येतोस घेउनी आमुचा तू काळ
आयुष्याची करितो तू आबाळ ||
कधी कधी फाटते आभाळ
आटती नदी नाले अवकाळ ||
पेरलं रानात बियाण मायंदाळ
भुईला नको करू तू घायाळ ||
जगायचं कस घेउनी लेकरबाळ
अन्नान करिती समदी पिलावळ ||
राजकारणी आमुचे थोर वाचाळ
करिती घोषणा सबसिडीच्या नाठाळ ||
नकोशी झालिय आता ही भिक्षावळ
आयुष्याची कशी झालीया होरपळ ||
हाती आमुच्या असती सदैव फाळ
जोडली आहे आमची मातीशी नाळ ||
का र असं नाचवितो पायी बांधुनी चाळ
सपान पडत र कधी हाती येतील टाळ ||
साकड घालितो आम्ही घेउनिया माळ
नको सावट हे दुष्काळाचे सदा सर्वकाळ ||
रविंद्र कामठे,पुणे
२)
|| काय झालय रे तुला पावसा ||
काय झालय रे तुला पावसा
रागावलायसा का रे पावसा ||
अस काय रे हे तुझे पावसा
रात्री नाही तर पड न दिवसा ||
पडलास कि नाही तू थोडासा
दिलासा मिळतो आम्हां माणसा ||
धरणीसही आहे रे तुझीच लालसा
कशाला ताणतोस रे ही जिज्ञासा ||
ये रे ये रे, ये ना रे पावसा
वाचव ना रे आमच्या कष्टाचा पैसा ||
नाही होणार कधीच हा खोटा पैसा
नागरून पेरलंय बियाण पसा पसा ||
अधुरी तुजवीण ही धरणी पावसा
तिच्यासाठी का होईना ये रे पावसा ||
बिथरलीत सगळी पाखर आता पावसा
दाणा पाण्यावाचून सुकल्या रे नसा न नसा ||
येशील तू अवकाळी बर का पावसा
नुकसान करून रडवशील ढसा ढसा ||
खरंच का रे तुला यायचंय का पावसा
पड ना रे मग मन लावून जोर तो कसा ||
पाप्यांना धुवायचीत पापे खसा खसा
ह्या गोदावरीस येऊ देत ना पूर पावसा ||
शुध्द करून ह्या साऱ्यांना कसा
जमलच तर साठीव पाणी धरणात पावसा ||
जायचय रे मला वारीला, घेतलाय मी वसा
दुबार पेरणीन पिकवू रान आपण पावसा ||
चंद्रभागेच्या तीरी लागली दिंड्यांची रांग दिवसा
हलकेच बरसुनी सरी, कर तू बारीला दंग पावसा ||
मेहरबानी होईल आलास तर मृगावरुनी पावसा
ओवाळतील आरती, तुझी रे सुवासिनी पावसा ||
रविंद्र कामठे, पुणे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
प्लॉट नं. ६, स्वाती सोसायटी,
गुरु सदन, धनकवडी,
पुणे - ४११०४३.
भ्रमण ध्वनी - ९८२२४ ०४३३०
मेल - ravindrakamthe@gmail.com
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.
पाने