Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




वांझ

काव्यप्रकार: 
शेतकरी काव्य

वांझ

नेहमीप्रमाणंच....
तुमच्यासारखंच....
हे बियानंही बोगस निघालं सरकार!
आलटून पालटून मारेकऱ्यांकडेच
पुन्हा तीच तक्रार !!

ज्यांनी उसवून टाकलीत आमची
उद्याची सोनेरी स्वप्न
हिरावून घेतलं मातीचं
गर्भारपणाचं सुख!
पाचवीलाच पुजलेलं
हे पिढीजात दुख!!

ही तर भ्रूणहत्याचं?
पंचवार्षिक योजनांमधल्या
आभासी आकडेवाऱ्यांसारखी?
तुमची हिरवळ वाढतेय...
माती मात्र पारखी !

माती झुरत राहिली
प्रसवपिडांच्या कळांसाठी
नी बाप हरखत राहिला
हिरव्या कोंबांसाठी !

पण त्याच्या भाबड्या आशेला
वास्तवाचा अंकुर फुटलाच नाही
कर्जाचा गळ्याभोवतीचा दोर
घट्ट झाला; पण सुटलाच नाही

बाप निळा काळा होवून
कुढत स्वतःवरच रुसला
नी मायच्या कपाळावरचा
लाल सूर्य पुसला !

मातीनंच घेतलंय आता
त्याला आपल्या कुशीत
लेकरही वाढतील याच
काळ्या आईच्या मुशीत !

माती माय नी बाप
तिघांच्याही डोळ्यांत
दिसायचं हिरवं सपान
लेकरांच्या वहीत दडलेलं
जसं पिंपळपान !

बापाला सहन झालं नाही
मातीचं वांझ राहणं?
मायला पोखरुण गेलं
बापाचं केवीलवाणं पाहणं !

तरीही बापाने
नव्हती सोडायची उमेद
करायचा होता
इथल्या भेसळीचा शिरच्छेद !!

निदान आता तरी
सोडून द्यावं
जगणं कन्हून कन्हून
लढायचं एकजुटीनं
भूमिपुत्र बनून !!

कदाचीत
त्याला ठाव नवतं
ही 'कृषीप्रधान व्यवस्थाच वांझ झालीय'
ह्या बियाण्यांसारखी म्हणून....!
ह्या बियाण्यांसारखी म्हणून.....!!
••••
©®✍️अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(पाऊलखुणाकार )
(कवी, निवेदक व लेखक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
MO. 9689634332
©®Copyright: - Aniket J. Deshmukh
Email - anudesh25488@gmail.com

दिनांक : १६ जुलै २०२० गुरुवार
गोपालखेड

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 10/10/2020 - 13:54. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही  प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास  विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.


    सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल.  त्यासाठी  Fingure-Right  लेखन करा  Fingure-Leff  येथे क्लिक करा. या धाग्यावर क्लिक करून आपली प्रवेशिका नव्याने सादर करावी.

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने