![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रक्ताचं पाणी
धोरणे आखली अशी की
धूळखात झाली स्वप्न सारी
मोल न कळले कुणा अमुचे
जीव टांगलाय शिवारी
संकट पेलूनी पुन्हा नव्याने
सुपीक केली ही माती
पीक पोसण्या जागल्या
कित्येक अंधारल्या राती
कर्जमाफीचं गाजर दाऊनी
भाव पाडीले मालाचे
उधारीतच गेले सारे
उत्पन्न औंदाच्या सालाचे
उत्पन्न खर्च नफ्याचे बी
शेतीत बजेट का नाही
परीक्षाच असते आमची बी
निकाली ग्याझेट का नाही
रक्ताचं करुनि पाणी
आम्हीच पिकवितो शेती
तरीही कष्टकऱ्यांची का
कर्जाच्या विळख्यात शेती
- रंगनाथ गु.तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि. वर्धा
7387439312
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
खूप छान!!!!
रक्ताचं करुनी पाणी....
तरीही कष्टकऱ्यांची का,
कर्जाच्या विळख्यात शेती.
बढिया !!! पद्यकविता
धन्यवाद, सर
धन्यवाद, सर
पाने