नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घाम गाळूनी राबतो
माझा बाप शेतकरी
मेहनत करूनीया
पिकवतो तो शिवारी......१
स्वप्न उराशी बांधुन
काळ्या मातीत पेरतो
वाट पाहुन पावसा
जीव कासावीस होतो......२
दिनरात तो करतो
काळ्या माऊलीची सेवा
नाही करत कधीच
दुसऱ्यांचा हेवादावा.......३
नाही अंगाला कपडे
खातो चटणी भाकर
डोईवर उन झेले
नसे कुणाचा चाकर.......४
खळं केल्यावर येई
डोई विचार नुसता
किती ठेवू घरी अन्
किती भरु कर्ज हप्ता......५
उभ्या जगाचा पोशिंदा
गोष्ट आहे खरीखुरी
पण कर्जबाजारीने
गळा लावतो तो दोरी.......६
सौ.भारती राजू लखमापूरे वरोरा जिल्हा-चंद्रपूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने