![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझ्या राजकीय लेखांवर भरभरून प्रतिक्रिया देणारे रसिक या कवितेला किती प्रतिक्रिया देताहेत हे मला पहायचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरभरून बोलणारी मंडळी या शेतकऱ्यांच्या विषयी लिहिलेल्या कवितेवर काय बोलतात ते मला पहायचे आहे. कारण कुणी कितीही म्हणाले तरी
शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतकऱ्यांचेच आहेत. त्यांच्या अडचणी सोडवणारे कुणीच नाही. विरोधो पक्ष फक्त भांडवल करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे. उदयापासून कांदा ५० रुपये किलो आणि मेथीची गड्डी १५ रुपयाला मिळू लागली तर हे विरोधकच महागाई वाढली म्हणुन बोंब ठोकणार. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे असा सूर धरायचा आणि शेतकऱ्याला भाव मिळाला तर महागाई वाढली अशी बोंब ठोकायची. आज सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यात भाजपानं कांदा ५० रुपये किलो होऊ दिला नाही तसेच शेतकऱ्याच्या एक किलो कांद्याला १० रुपयापेक्षा कमी भाव मिळाला नाही हे सगळ्यांच्याच हिताचं नाही का ? नाहीतर कॉंग्रेसच्या राजवटीत शेतकऱ्याच्या कांद्याला ५० रुपये किलो भाव मिळाला तसाच कांदा ५ रुपये किलोनेही विकावा लागला. व्यापाऱ्यांनी मात्र कांदा अगदी शंभर रुपये किलोने विकला.
मी भाजपाचं समर्थन करतोय असेच म्हणतील सगळे. पण वर नमूद केलेली वस्तुस्थिती कुणाला मान्य नाही ? जवळ जवळ मार्च महिन्यापासून मी गावाकडे विजेचा जो काही खेळ चालला आहे तो पहातो आहे. गेली आठ महिने पाणी असून वीज नसल्यामुळे शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही. पाणी असुन केवळ वीज नाही म्हणुन पिके जळून चालली आहेत ? म्हणजे गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या राजवटीला शेतकऱ्यांना वीजेचा पुरवठा करायला जमले नाही. आणि आज अजित पवार दुष्काळी भागाचा दौरा करणार ? कसली ही नौटंकी ?
पण मात्र या गोष्टीला वैतागलो आहे. नौकरी सोडुन शेती करायला गेलो. तीही साधीसुधी नौकरी नव्हे. प्रोडक्शन म्यानेजर या पदावरची. एका बहुदेशीय स्विडीश कंपनीतली. पाऊस तर कुणाच्याच हातात नाही. ना शेतकऱ्यांच्या ना विरोधकांच्या आणि ना सत्ताधाऱ्यांच्या. पण वीज पुरवण तरी पुरेशी वीज पुरवणं हे शासनाचं काम नाही का ? कविता कशी जन्म घेते याचं हि कविता एक उत्तम उदाहरण ठरायला हरकत नाही.
हि कविता वाचल्यानंतर विरोधकांच्या आणि शेतकऱ्याच्या अनुभवातला फरक वाचकांना कळेल.
गेल्या सात आठ महिन्यातल्या वीजेच्या या खेळणे मी पुरता वैतागून गेलो आहे. एकतर वीज पुरवली जाते आठ तास. त्यात ती पाच नसते. जी तीन तास असते त्या वेळात तिचा दाब एवढा कमी असतो कि विचारता सोय नाही. मोटरनं जेवढं पाणी पाटात टाकायला हवं त्याच्या निम्महि पाणी ती फेकत नाही. एक एकर शेताला पाणी दयायला तीन तीन दिवस लागतात. माझा ऊस सहा एकर. कसं पाणी देणार आणि कसा ऊस जिवंत ठेवणार. ट्रान्सफोर्मर जळतात ते वेगळेच. मोटर जळतात ते वेगळंच. स्टार्टर किती खराब होतात ते तर विचारायलाच नको. हे सगळा माहिती आहे उद्धव ठाकरेंना ? हि अशी झळ बसते अजित पवारांना ? हे असलं काही आमच्या शहरातल्या कवींच्या वाट्याला येतंय ?
अनेकांना ' कविता कशी जन्माला येते ? ' असा प्रश्न पडतो. मी जे काही लिहिलं आहे ते सारं मी अनुभवलं आहे. त्या अनुभवांची हि कविता - हे मुळ लेखन वाचण्यासाठी http://maymrathi.bogspot.com/ या लिंकवर क्लिक करा.