नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वर्तमान
काल होते जे विरोधी, आज सारे यार झाले
लोकशाही वाचवाया हे गजब सरकार झाले
कर्जमाफी खूप झाली, फायदा झाला कुणाला?
शासनाच्या योजनेचे लाघवी उपकार झाले
वेदनेचा सातबारा ना कधी झालाच कोरा
रोग होता जागतिक अन गावठी उपचार झाले
कास्तकारा वाचवाया लक्ष द्या साहेब थोडे
बारमाही यातनांचे शेत हेआगार झाले
मौन आहे बाप माझा वावराला पाहताना
काळ येवो रे सुगीचा स्वप्नरंजन फार झाले
प्रवीण तुरानकर
हनुमान नगर
राजुरा, चंद्रपूर.
9822572522
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने