नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
# साहेबांचा ....दसरा....
साहेब , तुम्ही मेलेल्या दुष्ट रावणाला जिवंत करून
दरवर्षी दसऱ्याला पुन्हा पुन्हा मारता...पण इथे..
आमचा शेतकरी काळ्या मायची ( सीतेची)
पिढ्यांनपिढ्यापासून आजही सेवा करतोय स्वतः ला राम समजून...
तो घेतोय आम्हां सर्वांची काळजी
म्हणून त्यालाच तुम्ही आता रावण समजताय...का?
गरिबीने मेलेल्या जिवंत
शेतकऱ्यांचा तुम्ही महागाईने रोजच साजरा करत आहे म्हणे दसरा अन करताय त्यांच्या बायका पोरांच्या स्वप्नांचे दहन....
कुठल्याच मालाला भाव न देता.
या माझ्या बळी राजाला
जिवंत मारून विकासाचं डिजिटल इंडियात
तुम्ही कसं काय सीमोल्लंघन साजरं करता
त्याविषयी कधी काही सांगाल का...? साहेब... तुमच्या मन की बातमधून....लाईव्ह...
# संदीप विकास गुजराथी,
सोमवार पेठ, चांदवड जि. (नाशिक)
मो.9604502715
gujarati.svcoe@snjb.org
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
दाहक वास्तव
दाहक वास्तव