नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अवंदाच्या सालामध्ये...
अवंदाच्या सालामध्ये
नाही पाणी बरसलं।
उभं पीक पाण्यासाठी
किती बाई तरसलं।
भुई होईन गर्भार
पीक येईन कोवळे
येई रोहिणी मिरुग
पुरवाया ते डोहाळे
आला आनंदी श्रावण
तिला झुलवाया झुले
पण गत या वेळेची
तिचे हात नाही ओले
तिच्या आसवे डोळ्यात
नाही मन हरकलं।
उभं पीक पाण्यासाठी
किती बाई तरसलं।
बाळ ओटीशी बांधून
आता फिरते ती आई
भूक पोटाची भराया
किती झुरते ती भुई
शाप मिळे वार्धक्याचा
गरगरते ती माई
तळहाताच्या रेषांना
किती गोंजारतें आई
भोग तसेच माथ्याचे
जिणं पुढं सरकलं।
उभं पीक पाण्यासाठी
किती बाई तरसलं।
चित्रा कहाते
नागपूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने