IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२
कार्यशाळेतील लेखमालेमधला हा बारावा लेख. आतापर्यंत आपण सोशल मीडियाची उपयुक्तता आणि फायदे बघितलेत. यांनंतरही फायदे आणि उपयोगिताच बघणार आहोत पण या बाराव्या लेखाच्या प्रासंगिक औचित्याने जरा सोशल मीडियामुळे होणारे संभाव्य तोटे आणि दुष्परिणाम बघुयात. इतर अन्य विधांप्रमाणेच सोशल मीडिया देखील एक दुधारी तलवार आहे. जरा जपून व काळजीपूर्वक वापर केला नाही तर हाच सोशल मीडियाचा वापर आपला आपल्यावरच उलटून आपलाच गळा कापून टाकण्याची शक्यता दाट असते.
-
फेसबुक, व्हाटसप, वेबड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स सहित अन्य माध्यमांचा वापर करून आपले बँक पासबुक व आधारकार्डसहित अन्य डाक्युमेंटसची देवाण-घेवाण केली जाते. end-to-end encryption आणि Privacy and security ची खात्रीशीर हमी या माध्यमांकडून दिली जात असली तरी वापरकर्त्याने अपलोड केलेला प्रत्येक डाटा main server कडे जाऊन नंतरच तो संबंधित व्यक्तीकडे पोचता होतो. उदाहरणार्थ : अमेरिकेत मेन सर्वर असलेल्या एखाद्या ऍपचा जर वापर तुम्ही तुमच्या घरी बसून करत आहात आणि जर तुम्ही एक संदेश तुमच्याच घरी १० फूट अंतरावर बसलेल्या आपल्या कुटुंबातील व्यक्तीला पाठवला तर तो संदेश थेट तुमच्याजवळील व्यक्तीकडे न जाता आधी अमेरिकेतील सर्व्हरकडे जातो आणि तिथून परत येऊन तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पोचता होतो. प्रकाशाचा वेग प्रती सेकंद लक्षावधी किलोमीटर असतो. इंटरनेट सिग्नलच्या वेगाची गती सुद्धा अद्भुत असल्याने व त्याविषयी वापरकर्त्याना काहीच माहिती नसल्याने सामान्य व्यक्तीला अशी अजिबात जाणीव नसल्याने त्यांच्यासाठी ही कल्पनातीत बाब असते.
-
शासन-प्रशासन व गुप्तचर संस्था ऍप निर्मात्यांकडून थेट कनेक्टिव्हीटी मिळवून हव्या त्या व्यक्तीचे संदेश टॅप करू शकतात.
-
हॅकर्स कोणत्याही ऍपची सुरक्षा भेदून तुमचे संदेश स्वतःकडे वळवू शकतात आणि वाचू शकतात.
-
वायरस, मालवेअर वगैरे मोबाईलमध्ये घुसवून मोबाईल डाटा चोरी केला जाऊ शकतो.
-
महत्वाचे म्हणजे ज्या कंपन्यांचे आपण ऍप्स वापरतो त्या कंपन्याच आपला डाटा विकू शकतात. असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत.
चोरांना बँक बॅलेन्स खाली करणे सोपे?
व्हाटसप, फेसबुक मॅसेंजर सहित अन्य सोशल मीडियाचा वापर करून चेकचा फोटो, पासबुकचा फोटो, आधार कार्डाचा फोटो वगैरे डाक्युमेंटस एकमेकांना सर्रास पाठवले जातात. किंवा मोबाईल मध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे आपला मोबाईल नंबर, बँकेचे नाव, शाखेचे नाव, MICR कोड, IFSC कोड, खातेदाराचे नाव वगैरे इत्यंभूत माहिती हॅकर्सला उपलब्ध होऊ शकतेच. मग अशा स्थितीत फक्त Password आणि OTP तेवढा मिळवायचा बाकी असतो. बेमालूमपणे किंवा सावधगिरी न बाळगल्याने किंवा आपल्याला इंटरनेट व्यवहाराची माहिती नसल्याने जर Password आणि OTP हॅकर्सना मिळून देण्यात आपणच चूक केली तर आपला बँक बॅलेन्स रिकामा व्हायला फार वेळ लागणार नाही.
हे सर्व आर्थिक फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी बँकांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केलेली असते. ज्यामुळे आपले खाते १००% सुरक्षित असते पण त्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला माहित असणे अनिवार्य असते. त्याविषयी पुढील लेखात अधिक विस्तृत उहापोह करू. मात्र फसवणूक होऊ नये म्हणून कुणी इंटरनेटचा वापरच करायचा नाही असे म्हणत असेल तर तो भयंकर मूर्खपणा आहे. इंटरनेट तंत्रज्ञान आणि त्याचा वापर इतका पुढे निघून गेला आहे कि परतीचे दोर कापले गेले आहेत. अशा स्थितीत इंटरनेटचा वापर आपल्याला करता येत नसेल किंवा त्याविषयी आपल्याला काहीच माहित नसेल तर सोशल मीडियाचा चक्रव्यूह तुमचा कधीही अभिमन्यू करू शकतो, इतके पक्के लक्षात ठेवावे.
फेसबुक असो कि व्हाटसप, दोन्ही सध्या तुफान लोकप्रिय असून साऱ्या जगाला या दोन माध्यमांनी आपल्या नादी लावलं आहे. जसा नदीचा प्रवाह सदैव पुढेच जात असतो. मागे उलटपावली परतून येऊ शकत नाही; अगदी तसेच मानवी उत्क्रातींच्या कालक्रमण प्रवाहाचे आहे. उत्क्रांतीची दिशा सुद्धा सदैव पुढेच मार्गक्रमण असल्याने कुणी जर इंटरनेट तंत्रज्ञानापासून अलिप्त राहायचे किंवा परत फिरायचे म्हटले तरी त्याने स्वतःचा घात होऊन स्वतःच मागे पडण्याशिवाय अन्य काहीच चांगले घडण्याची शक्यता नाही. त्यामुळेच अधिकाधिक तंत्रज्ञान आत्मसात करून अधिकाधिक सुरक्षितता वाढवणे, हाच एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे.
शुभेच्छेसह!
- गंगाधर मुटे
=======
प्रतिक्रिया
अत्यंत महत्त्वाची माहिती
अत्यंत महत्त्वाची माहिती
प्रदीप बा देशमुख
धन्यवाद सर
धन्यवाद सर
शेतकरी तितुका एक एक!
भाग १२
धोके व चुका याबाबत उपयुक्त माहिती
रावसाहेब जाधव (चांदवड)
धन्यवाद सर
धन्यवाद सर
शेतकरी तितुका एक एक!
(१) पासवर्ड (२) ओ.टी.पी. या दोन गोष्टींची सुरक्षितता !
(१) पासवर्ड (२) ओ.टी.पी. या दोन गोष्टींची सुरक्षितता !
' माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा लेखमाला ' अंतर्गत भाग १२ मध्ये ' आंतरजाल तंत्रज्ञान ' आणि
' समाज माध्यम ' यांवर असणारे धोके आणि फसवणुकींच्या कारणांमधले सर्वांत जास्त कळीचे मुद्दे - खरं म्हणजे सर्वांत महत्त्वाच्या दोन
कळी ( कीज् ) - (१) पासवर्ड (२) ओ.टी.पी. .
या दोन गोष्टींची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, हे स्पष्टीकरण देऊन सोप्या भाषेत आपण छान समजावून सांगितले आहे.
- महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
लेखमाला लिहून झाली कि पुढील
लेखमाला लिहून झाली कि पुढील टप्यात आपण इतरांकडे असलेल्या ज्ञानाचे आदान-प्रदान करणार आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी मलाही शिकता येतील तसेच ही कार्यशाळा समृद्ध होऊ शकेल.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण