नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जबाबदार कोण?
गर्वाने सांगतोय आम्ही,
'भारत कृषीप्रधान देश'!
खेद वाटतोय याचाच की;
याच देशात येतोय आज,
शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस !!
डोई उभाय हिमालय कर्जाचा,
याशिवाय दुसरं काहीच नाही दिसत !
त्यात कधी फाटतं आभाळ....
तर कधी;
पाण्याचं टिपूसही नाही दिसत!!
आगडोंब उसळता भूकेचा,
शांत बसेल का हे टिचभर पोट
घरच्यांची उपासमार पाहून,
बळीराजा घेतोय विषाचा घोट !
ऐकतोय मी लहानपणापासूनच..
की एकेकाळी, याच देशी निघे सोन्याचा धूर !
पण...! आज वाहतोया येथेच...
शेतकऱ्यांच्या अश्रूंचा पूर!!
सदा राबतो हा बळीराजा,
पुरविण्या जगाला अन्नाचा घास
का आवळावा लागतोय त्यालाच आज,
आपुल्या गळ्याभोवती फास!!
सारं जीवनच फुटलया शेतकऱ्यांचं
मग...'किती'? नी 'कूठं-कूठं'?
जोडणार लिकेज
'कुंकवाचा धनी' गेल्यावर मिळतं...
सरकारचं कुरतडलेलं प्याकेज!!
बांगडी फुटते आहे रोजच...
कधी येणार सरकारला जाग ?
बापाला द्यावी लागतेय आज...
मुलाच्या चितेला आग!!
भ्रष्ट राजनितीनं पोखरलेली
ही 'लुळी पांगळी सरकारं'
ज्यांनी चालवलाया वर्षानूवर्षे...
गोर - गरीबांच्या जीवनाचा बाजार !!
भ्रष्ट नेत, सावकार, नि दलाल...
यांच्या घशात गेलयां, शेतकऱ्यांचं सारं धन!
फक्त ; चर्चांमद्धेच गुरफटलेला प्रश्न -
"शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार तरी कोण??"
विचारतोया एवढेच की ,"जबाबदार कोण... ????
©:-अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड पो. गांधीग्राम
ता. जि. अकोला 444006
Mo-9689634332
©Copyright Aniket Deshmukh
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मनःपूर्वक धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद सर
पाने