नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा २०१९
विषय-कर्जाच्या विळख्यात शेती
पद्यलेखन
--------------
मोडून जाईल देश
--------------
लग्नासाठी पोरीच्या त्या
गहाण ठेवली शेती
बेसहारा झाले सारे
मजूर म्हणूनी जाती //
विहिरीसाठी कर्ज काढले
फेडत आला नाकी दम
दुष्काळाने पाणी नाही
पाठी लागला यम //
पोरांच्या त्या शाळेसाठी
नाही पैका नाही अडका
कामासाठी फिरतो दारी
भणंग भिकारी कडका //
रात्रंदिनी राबत होतो
भरवत होती काळी माय
दूधासाठी दारी होती
खोकड काळी गाय //
बैल गेले गाय गेली
भकास झाला गोठा
बाप गेला माय गेली
भकास झाला ओटा //
कर्जापाई भांडे कुंडे
गहाण पडले सारे
पर्याय नव्हे आत्महत्या
पण शिरी भन्नाट वारे//
कर्ज माफी शासन दारी
पाऊल नव्हे वाकडे
शेतकऱ्यांच्या हितासाठी
क्रृषिवलाचे साकडे //
शेती नव्हे एकट्याची
मालक आहे देश
मोडून गेली शेती तर
मोडून जाईल देश //
~ नितीन साळुंके
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने