Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***गारपीट

लेखनप्रकार: 
गद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
कथा

गारपीट
==========

"कारभारनी अग ए कारभारनी म्या जरा शेहरातजाऊन येतुया काई आणायचं हाय का ?"...
शिरपा बाहेरूनच ओरडला धुर्पा साडीला हातपुसतचबाहेर आली.. आणि म्हणाली
" आवंआपल्या कमळीला जिलबी खायचे डाव्हाळेलागलेततेव्हढी घेऊन या "
तसा शिरपा लाडात येत म्हणाला, "ए कार्भारणे आपले दिस आठवले बगकाम्ळीच्यानी तुला दिस गेल्तेतवा तुला बी जिल्बिचेच डाव्हाळे लागले व्हते न ??"
धुर्पा लाजली अन लटक्या रागानेचम्हणाली
"जावा तिकड काय येळ काळ हायका न्हाई...आता पोरीच बी लगीन झालया.. आता नातवंडव्हईलदोन म्हयन्यात.. चावटपणा कमी करा आता "
शिरपा म्हणाला
"खरं सांगू अजून बी तूपह्यल्या सारखीच जवान दिस्तीस बग मन अजूनबी तुझ्याकडे वाढतंय"
धुर्पा लाजून म्हणाली "पुरंपुरं जावा विशीर व्हातोया मला कामाला अनपोहरयाचा दोर पण खंड्लाय त्यो पण आना"

शिरपा खुशीतचनिघाला... धुर्पा तिच्या कामाला लागली....संध्याकाळी शिरपा मस्तजिलबी आणि पोहर्याचा दोर घेऊनआला.. कमळीला आवाज देतच तो घरातआला "कमळेss अग एsss कमळेss अग बग तरी कायआणलंय ते"

कमळी हळू हळू वाढलेल्या पोटाचा तोलसावरत बाहेर आली.. जिलबी बघून तिचे डोळे
चमकले....पण लगेच ती बोलली
"बा कशापाई एवढा खर्चकार्तुयास?? आधीच
माझ्या लाग्नानी कर्जाचा डोंगरहुबा राह्यलाय तुझ्या म्होर, आणि अजुक माझबाळात्पणा चा खर्च हायच कि तुझ्या डोस्क्यावर "

तसा शिरपा म्हणाला
"हरणे! तू नग काळजी करूस ग..तुझा बा जिता हाय आजूक"

रात्री कमळी झोपताना आईला म्हणाली
"माय तूकाई बी आणाया सांगू नगस बा ला, आधीच सावकाराच कर्ज झालया आडी नडी ला ऱ्हाऊ देपैक"

धुर्पा हं म्हणाली आणि तोंड फिरवून झोपली, पण डोक्यात विचार चालूच होते..... यंदा गहू चांगलाच तरारून आला होता. एका महिन्यात पिक हातात येईल, मग सावकाराच देणं पण देऊन टाकता येईल,आणि कमळीच्या पोराच बारस थाटात करता येईल..लग्नात जावाई अंगठी पाहिजे म्हणून रुसला होता, तर त्याला या खेपेला बारशाला बोलावूनअंगठी देता येईल... सगळी स्वप्न डोळ्यात घेऊनधुर्पा झोपली....पहाटेच जोरात आवाजांनी धुर्पा जागी. झाली पत्र्यावर कोणी दगड मारतंय असा जोरात आवाज येत होता. तिने खिडकीतून बाहेर बघितलं तर मोठ्या मोठ्या गारा पडत होत्या. धुर्पा जोरजोरात ओरडतच बाहेरच्या खोलीत गेली "धनी अव धनी बागा कि वकेव्हड्या मोठ्या मोठ्या गारा पडयल्यात"
शिरपा खडबडून जागा झाला. एक क्षणत्याला सुचेचना, की काय होतंय तो नुसता बाहेरबघत होता... क्षणातचतो उठला आणि म्हणाला
"कारभारनी छत्री आनम्या शेतावर जातु "
धुर्पा म्हणाली
''धनी म्या तुम्हास्नी नाई जाऊ द्यायची इजा कडकडाय्ल्यात तुमचा जीव महत्वाचा हाय पिक गेल तर परत येईल धनी''

शिरपा बेचैन होऊन सगळ्या घरांनी नुसत्या फेऱ्या मारत होता.....दिवस उजाडला गारपीट थांबली शिरपा नी तोंड पण धुतलं नाही तो तसाच शेतात गेला...... गारपीटआणि वादळी वार्यामुळे तरारून आलेला गव्हाचा पार चिखल झाला होता..... शिरपा तिथच डोक्याला हात लावून कितीतरी वेळ बसून राहिला. डोक्यात खूप विचार होते. आता सावकाराच कर्ज कस फेडायचं ? यंदा एक बैलजोडी घ्यायची होती, ते पण राहील...अजून कमळीच्या बाळंत पानाचा खर्च कसा करायचा, आधीचे पैसे दिले नाहीत तर सावकार कर्ज तरी कसा देईल? अखेर शिरपाचा मुलगा त्याला बोलवायला शेतात गेला.. शिरपा विचारांच्या नादातच घरी आला.. अंघोळ केली, धुर्पा नि त्याला जेवायला वाढल तो काहीच नबोलता जेवला...घरातलं सगळ काम आवरून धुर्पा बाहेरआली. शिरपा अजूनही डोक्याला हात लाऊन विचारकरत बसला होता. धुर्पा त्याच्या जवळ गेली म्हणाली,

"धनी आता अस सोताला तरास करून घेऊ नगासा. व्हईल त्या देवाच्या मनात असंन तसं...कावा धरण इचार करतायसा.. "
तसा शिरपा धाय मोकलून रडू लागला. धुर्पाचा पण धीर खचला होता. पण दो जीवाच्या कमळी कडे बघून ती गप्प होती. धुर्पा म्हणाली
"धनी तुम्हास्नी असरडताना बघून त्या दो जीवाच्या कमळीला काय वाटन याचा तर काही इचार करा"
धुर्पाचे ते शब्दऐकून शिरपा गप्प झाला "पोरांकड बगा धनी. कशी हिर्मुस्ल्यावणी बसल्याती "
तसा शिरपा उठला आणि बाहेर निघूनगेला.. धुर्पा स्वयंपाकाला लागली.. रात्री पण
सगळेच मुकाट्यानी जे पानात पडेल ते जेवले, आणि झोपले....धुर्पा प्रातर्विधी आटोपून घराकडे येत असतानाच खूप लोक गावाबाहेर च्या बाजूला पळत जाताना दिसले... धुर्पानी एका पोराला आडवून विचारलं
"काय र गण्या काय झालया?"
गण्या म्हणाला
"काकी शेतात कोण तरी फास घेतलाय"
विचार करतच घरी आली... खाटेवरधनी दिसला नाही... धुर्पा नि सासूला विचारलं
"आज्जी माय धनी कुठ दिसलं का ओ ?"
सासूम्हणाली फाटच गेला
" धुर्पा आत गेली, पाहते तो पोहर्याचा नवीन आणलेला दोर दिसत नव्हता... तशी धुर्पाच्या पायाखालची जमीनच सरकली..... तिने हम्बराडाच फोडला... कमळी धावतच आईपाशी गेली... तिला काहीच कळत नव्हत...तिनी आईला विचारलं "माय काय झालं ग बोलकि "
तशी धुर्पा परत एकदा हंबरडा फोडतचम्हणाली
"तुझ्या बा नि जीव दिला ग sssss पोरी शेतातफास घेतलाया ग त्यांनी"
कमळी नी पण हंबरडा फोडला... इतक्यात दारावरची कडी जोरात वाजली. दारात पोलिस होते.... म्हाताऱ्या आईला तेविचारत होते
"शिरपा माने च घर हेच का ?"
म्हातारी म्हणाली, "व्हय हेच हाय शिरपाचं घर, आता काय पंचनामा का रं बाबा?" पोलीस खिन्न आवाजात बोलले,
"काय करावं आजी माय कामच आहे हे. आमचं आमच्यापण जिवावर येतय, पण त्याला इलाज नाही"
पोलिसांनी विचारायला सुरवात केली, "घरात कोण कोण आहे?"
म्हातारी "आता आमी सा जन हाईत शिरपाची बायकु धुर्पा, आन त्यांचे चार पोरं. तीन पोरं एक पोरगी"
पोलिस, "काय करतेत पोरं?"
म्हातारी, "साळला जात्याती"
पोलिसांनी सगळी चौकशी केली. म्हातारीला म्हणाले
"शेतावर यावं लागल कोणीतरी आमच्या सोबत"
म्हातारी म्हणाली
"चल बाबा म्याच येते म्या मोप खंबीर हाय. याच्या बा न बी असच केलं आता यानंबी. आमी हाव की चार चार लेकरं पदरात घेऊन.फरपटत जगाया"
पंचनामा झाला.. धुर्पा चारी लेकरांना घेऊन शेतात गेली .. गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी थोडे थोडे पैसे गोळा करुन शिरपावर शेतातच अंत्यसंस्कार केले..प्रतेकाला शिरपामधे आपलं प्रतिबींब दिसत होतं.खिन्न मनानी धुर्पा चारी लेकरांना घेऊन भर उन्हात अनवाणीच पायपीट करत घरी आली.... सगळं आयुष्यच संपल्यासारखं तिला भासत होतं... घरात जागोजागी शिरपाच्या आठवणी दडल्या होत्या... अंगणातली रिकामी खाट बघुन धुर्पा ला परत उमाळा आला... कमळीनं आईला सावरलं. कमळीकडे बघुन धुर्पानी स्वतःच्या मनाला आवर घातला... अंघोळ करुन शेजारणी नं आणुन दिलेला पिठलं भात खाईपर्यंत संध्याकाळ झाली…संध्याकाळी जावाई आला.. धुर्पाची आणि कमळीची अवस्था त्याच्यानी बघवत नव्हती.. सगळ्या घरानी हळुहळु अंधार दाटु लागला... अंधाराचा फायदा घेऊन प्रतेकजण आपल्या डोळ्यात येणारी आसवं पुसत होता... मध्यरात्र उलटुन गेली तरी धुर्पाला झोप लागत नव्हती.. आता बँकेचं देणं त्याचा हाप्ता कसा द्यायचा? सावकाराचं देणं कसं फेडायचं? कमळीचं बाळंतपण कसं करायचं? चार पोरं आहेत पदरात त्यांना कसं पोसायचं? सगळ्याच चिंता तिचं डोकं पोखरत होत्या... यातुन कसा मार्ग काढायचा? कष्टाला पर्याय, नव्हता आणि धुर्पा डगमगणारी पण नव्हती, पण व्यवहारी जगाशी तिची ओळखच नव्हती.. कुणी फसवणुक केली तर? तर काय करायचं अनेक चिंता धुर्पाला छळत होत्या.. कुणाला विचारु कुणावर विश्वास ठेऊ? या विचारातच रात्र निघुन गेली सकाळ होता होता धुर्पानी विचार केला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिरपाचा मित्र राजु त्याच्या बायकोकडे मिळतील... ती चार पुस्तकं शिकलेली पण होती, आणि कुठल्याशा पतसंस्थेत कामाला पण होती.. मग धुर्पा एका निश्चयानी उठली ....अंगण झाडायला गेली, तिथं जावाई अजुन झोपलेला होता.. मग ती तशीच आत गेली काल पासुन धुतलेले केस नुसतेच बांधुन ठेवले होते.. ते सोडले केस विंचरून घट्ट वेणी घातली, आणि आरश्यात बघायला गेली, कपाळावर ठसठशीत कुंकवाच्या जागी आजा नुसतच गोंदण बघुन धुर्पाचं मन पुन्हा एकदा भरुन आलं... भुतकाळाच्या आठवणी कपाळावरच्या कुंकवासारख्या लगेच थोडीच पुसल्या जाणार होत्या?? त्या आठवणी तर ह्या गोंदणासारख्या कायम तिच्या बरोबर राहाणार होत्या.. धुर्पा आपल्याच विचारात गुंग असतानाच बाहेरुन जावायाची हाक आली, "कमळेssss" तसा धुर्पानी आरसा बाजुला ठेवला.. कमळीला उठवलं आणि ती पटकण बाहेर गेली.. तसा जावाई म्हणाला
"मामी म्या निगतो आता चार दिसाला परत चक्कर मारतु तवा कमळीला घेऊनच जाईन म्हणतुया"
तशी धुर्पा म्हणाली "कमळीला आमी बाळातपणाला आणली नव्ह मंग असच कसं घेउन जातासा?"
जावाई म्हणाला "तसं न्हाई मामी आता घडू ने ते ईपरीत घडलया.. आता तुमचेच वांधे हायती तवाsss"
तशी धुर्पा म्हणाली "तिची माय जिती हाय न्हव तवर काळजी करु नगासा"
तसे जावायानी खिशातुन पैसे काढले आणि म्हणाला "हे थोडं ठिवा आडी नडीला"
धुर्पा म्हणाली "आता हायती आडी नडीला लागले तर तुमच्याच कडं मागन"
जावायाने पैसे तसेच खिशात ठेवले कमळीनी तोपर्यंत चहा करुन आणला.. चहा घेऊन जावई निघाला... कमळी दारापर्यंत सोडायला गेली. तिला एकदम भरुन आलं.. तसा नवरा म्हणाला
"आता तु रडू नगस मायला, आज्जीमायला, भावानला सांबाळ म्या येतु चार दिसानी परत"
शिरपा ला जाऊन आज तीन दिवस झाले.. धुर्पाच्या माहेरचे लोक येउन दुखवटा काढुन गेले.. धुर्पाला, कमळील, आणि अज्जीमायला साडी' पोरांना कपडे' जेवायला गोडधोड करुन संध्याकाळी सगळे गेले.. आता धुर्पा घराबाहेर पडायला मोकळी झाली.. आता सगळ्यात मोठा प्रश्न होता तो रोजच्या खाण्यापिण्याचा, आणि कमळीच्या बाळंतपणाचा.. त्यासाठी आधी पैसा गरजेचा होता.. मनाशी खूप काही ठरवून धुर्पा दुसऱ्‍या दिवशी पहाटेच उठली, आधी गाईची धार काढली, वरव्याच्या घरी वरवा घातला, प्रतेक घरी तिने काही काम आहे का याची चौकशी केली.. पण कोणीच हो म्हणेना, शेवटी सावकाराच्या वाड्यावर गेली... बेरकी सावकार बाहेर सोप्यातच बसलेला होता.. धुर्पाला बघुन तो म्हणाला "धुर्पे तुझं दागीनं हायती हितं गाहान ठिवल्यात शिरपा नी"
धुर्पा म्हणाली "व्हय जी"
तसा सावकार म्हणाला "त्याचा हप्ता भर न्हायतर दागीनं इसर"
धुर्पा म्हणाली "आता तुम्हास्नी म्हायीत हाय नव्ह काय झालया ते..? म्या थोडे थोडे करुन देते पैकं, पर दागीनं मोडू नगासा माझं"
सावकार म्हणाला "नवऱ्‍यानी कढलेलं कर्ज काय तुझा बा फेडणारे का? दागीनं आता माझ्या नावावर कराव लागल तवा इचार कर, अन म्हयन्याच्या आत पैक आणुन दे हाप्त्याचं"
तशी धुर्पा म्हणाली "आता अन इस हजाराच्या कर्जापाई लाखमोलाचं दागीनं कसं तुमच्या नावावर करता व सावकार?"
सावकार म्हणाला "अन त्याच्यावर याज न्हाई का झालं नऊ म्हयन्याचं?" धुर्पा म्हणाली काय लाखभर याज व्हतय का नउ म्हैन्यात?"
सावकार म्हणाला "चाळीस हजार दे मग दागीनं देतो"
धुर्पा म्हणाली म्या तुमचं पैकं परत करीन"
धुर्पा वरवा घालून घरी आली. तिने कोणाच्या नकळत दागिन्याचा डबा उघडून बघीतला एक बोरमाळ, दोन कुड्या, अन दोन पाटल्या होत्या. तिने डबा तसाच झाकुन ठेवला. दुपारी ती कुठ काम मिळतंय का ते शोधायला गेली.. एका गुत्तेदारानी तिला बांधकामाच्या जागी विटा उचलायच काम दिलं.. धुर्पानी हुशारीनी पगार ठरवला.. संध्याकाळी येता येता रस्त्यात सावकार भेटला.. धुर्पाला बघुन म्हणाला
"असं रोजंदारीन काम करून करुन कधी फेडणार तु कर्ज? त्यापरीस रोज दुपारच्याला शेतावर येक चक्कर मारत जाय, निवांत भेटत जाऊ.. तुझ दागिन पण परत करतो, वरती रोजानं तुला पैकं देतो"
धुर्पानी भर रस्त्यात सावकारचा कानाखाली सनसनीत लगावली, आणि चिडून म्हणाली "चुलीत घाल तुझं ते पैकं अन त्याच्यावर एक कप चा तर व्हतुया का बग.. पैश्यावर दुनिया चालत न्हाय. आपल्या पायात बळ लागतया चालाया.."
सावकाराने इकडे तिकडे चोरट्या नजरेनं पाहिलं कोणी बघीतलं तर नाही नं, आणि तो धुर्पाला "बगुन घेईल तुला" अशी धमली देऊन निघुन गेला…आता धुर्पा जास्तच जिद्दीला पेटुन काम करु लागली... मिळेल ते काम करायचं पण स्वाभिमानानी जगायचं... आणि कमळीच्या बाळंतपणासाठी पैसा बाजुला टाकायचा... कधी बांधकामाच्या जागी विटा उचलायचं, कधी रस्त्याचं काम चालु असेल तिथं गिट्टी फोडायचं, कुणाच्या शेतावर खुरपायचं, जे पडेल ते काम करायचं रोजचा खर्च भागवू लागली. शिरपाला जाऊन दहा दिवस झाले.. अचानक धुर्पाच्या घरासमोर एका मागे एक गाड्या थांबल्या.. धुर्पा आणि कमळी दोघीच घरी होत्या … धुर्पा घाबरली कोण आलाय हे कळायच्या आत घरासमोर हि गर्दी झाली.. इतक्यात एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला नेता आत आला.. तो मुख्यमंत्री होता.. त्याला बसायला लोकांनीच सतरंजी टाकली.. अनेक न्यूज चानेलवाले आपआपले क्यामेरे लाऊन उभे होते.. धुर्पा खूप घाबरली होती.. मुख्यमंत्री म्हणाले
"तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.."
इतक्यात आज्जीमय आली तिने सरळ पायातली वाहन काढून मुख्यमंत्र्याच्या अंगावर भिरकावली
"कशापाई आलायसा"
आज्जीमाय फान्कार्यानी ओरडली. तसे बाकी सगळ्यांनी आजीमायचे हात धरले
"४० वर्सामाग माझ्या धन्यांनीबी असाच फास घेतला व्हता. तवा बी असंच एक मंत्री आल्त. त्यांनी बी मदत देतो म्हनला व्हता.. एक पण पैका आमच्या पातुर आला न्हाई.. निस्त ढोंग असतया आणि काई न्हाई.. चल निगा हितन…"
आज्जी माय चा रुद्रावतार बघून मुख्य मंत्र्याला पण काढता पाय घ्यावा लागला... पोरांना शाळेला सुट्टी लागली तशी आजीमाय पोरांना घेऊन शेतावर जाऊ लागली.. थोडं थोडं करुन शेत साफ करुन घेतलं.. चारा काटक्या घेऊन पोरं घरी येऊ लागली.. बराच चारा आणि चार महिने पुरतील ईतक्या काटक्या आजीमाय आणि पोरांनी गोळा केल्या.. कमळी नंतरच्या म्हाद्यानी एका हॉटेलात पन्नास रुपये रोज, आणि जेवणं अशा रोजानी काम सुरु केलं... कुटुंबातले प्रतेकजणं आपआपल्या परीने हातभार लावत होते.. बघता बघता दोन महिन्यात खर्च भागुन तीन हजार रुपये बचत झाली होती.. आता कमळीच्या बाळंतपणाची चिंता मिटली होती.. पण नियती हात धुवून मागे लागली होती.. अचानक दारावर नोटीस लागली विजेचा हाप्ता भरा.
नाहीतर विज प्रवाह खंडीत केला जाईल.. आता हि एक नविनच चिंता समोर उभी राहिली.. धुर्पानी जमवलेला पैसा विजेचं बील भरण्यात गेला.. ती परत एकदा नव्या जोमानी कामाला लागली.. आता तिला धुणं भांड्याची घरं पण मिळाली होती.. तिथलच उरलं सुरलं आणायचं फोडणी टाकायचं आणि खायचं.. परत एकदा कष्ट करुन धुर्पानी दोन तीन हजार शिल्लक टाकले.. एका रात्री अचानक कमळीला कळा यायला सुरवात झाली.. कमळीला दवाखाण्यात नेलं.. तिनं एका गोड मुलाला जन्म दिला..आता पोरांची शाळा सुरु झाली …म्हद्याला धुर्पानी काम सोडायला लावलं..तिला पोरांना शिकवून मोठ करायचं होत... पोर शाळेला गेली आज परत काही लोकं येउन एक कागद देऊन गेले धुर्पा म्हणाली "हे काय हाय र बाबा"
त्यातलाच एक जन म्हणाला "बँकेचा हप्ता थकलाय तो भरा नाही तर मग शेतावर्जप्ति येईल बँकेची"
आता मात्र धुर्पाचा धीर खचला.. ती मटकन तिथेच बसली.. आता शेतावर जप्ती आली तर काय करायचं? ती तसाच तो कागद घेऊन राजूच्या बायको कडे गेली.. राजूच्या बायकोनी तिला सगळ समजून सांगितलं बँकच ५० हजारच कर्ज आहे.. सहा महिन्याला २५ हजाराचा हप्ता द्यायचं आहे.. त्याची मुदत संपली तर शेतावर जप्ती येणार आहे.. आता मात्र धुर्पाच्या पायाखालची जमीन सरकली.. तिने राजूच्या बायकोचा सल्ला घेतला तिने सांगितलं २५ हजार भरा आता म्हणजे शेतावर जप्ती येणार नाही.. नंतर शेत साळणी देऊन पिक घ्यायचं.. आणि पुढचा हप्ता त्या पिकावर भारायचा.. म्हणजे शेत वाचेल.. धुर्पा तिथून निघाली, पण डोक्यात एकाच विचार होता, आता पंचवीस हजार कुठून आणायचे?? धुर्पा घरी गेली तिने परत एकदा दागिन्यांचा दाबा उघडला.. शिर्पनि तीच मंगळसूत्र आणि दोन बांगड्या जव्हा सावकाराकडे गहाण ठेवल्या तेव्हा शिरपा म्हणाला होता "कार्भारणे हि बोर मार अन पटल्या तुझ्या माहेरून आल्याती ते तुझ स्त्री धन हाय ते कधीबी इकायचं न्हाई, मोडायचं पण न्हाई, अन गहाण बी ठीवायचं न्हाई.." ते वाक्य आठवून धुर्पाच्या डोळ्यात पाणी आल.. पण आता शेत वाचवायचं तर दागिने गहाण टाकण्याशिवाय पर्याय नव्हता... ती दागिने घेऊन लगबगीन सोनाराकडे गेली.. सोनारानी दागिने नीट पारखून घेतले.. धुर्पला विचारलं
"किती पैसे पाहिजेत?"
धुर्पा म्हणाली
"४० हजार द्या"
सोनारणी तिला सांगितलं
"दर महिन्याला ३% व्याज बसेल"
धुर्पा म्हणाली "म्हंजी किती द्यावं लाग्तीन म्हय्ण्याला?"
सोनार म्हणाला "जोवर तू सगळ पक परत करत न्हैस तोवर तुला महिन्याला १२०० रुपये पडतील"
धुर्पानी नाईलाजाने मान हलवली.. आणि पैसे घेतले.. पैसे घेऊन धुर्पा राजूच्या बायको कडे गेली.. दोघी मिळून बँकेत गेल्या.. २५ हजाराचा हप्ता आणि ६ हजार व्याजापोटी असे ३१ हजार भरून दोघी परत निघाल्या.. धुर्पाच मन सुन्न झाल होत.. ती घरी आली उरलेले ९ हजार पुडक्यात बांधून घरातल्या वास्यावर लपवून ठेवले.... आता धुर्पला हात पाय गाळून चालणार नव्हत तिने निर्णय घेतला खरीपाच पिक घ्यायचं...तीनि शेताकडे लक्ष द्यायचं ठरवलं... गावातल्याच दोन चांगल्या सालदाराकडून सर्व माहिती करून घेतली... आणि त्यातल्याच एका सालदाराच्या पोराला शेत सालानी दिलं...तिसरा हिस्सा त्याला ठरला...आता बाकीच्या खर्चाला किमान दहा हजार सुरवातीला लागणार होते... तिने वास्यावर ठेवलेले पैसे काढले आणि त्यातले एक हजार ठेऊन आठ हजार सालदाराला दिले… शेतच काम चालू झालं. पण आता रोजच खान पीन आणि पोरांच्या शाळेची फीस यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. पोरांना सहामाई परीक्षेला बसू दिल जाणार नाही आसं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं. धुर्पा जिथ धुण भांडी करायची त्यांच्याकडून तिने ३ हजार उसने घेतले. कामातून वळते करा अस तिने सांगितलं. मुलाचं वर्ष वाचलं. धुर्पाचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. घरात खाणारे ५ तोंड आणि येणारा पैसा कमी. धुर्पा तीच रोजच काम आटोपून झालं कि १ चक्कर शेताकडे मारून मग धुर्पा घरी येऊ लागली...धुर्पा चा सगळा दिवस कामात जाई....आजी माय कमळीची आणि बाळाची काळजी घेत होती... कमळी ला धुर्पा नि काही कमी पडू दिलं नाही...

कमळीला बाळंतपण चांगलंच मानवल होतं...सहा महिने उलटले जावई कमळीला न्यायला आला... धुर्पा नि थाटात बारस केल...कमळी सासरी निघाली तशी धुर्पा म्हणाली जावाई बापू लेकराला गुंजभर सोन बी घालू न्हाई शकले आता पिक आलया तव परतच्या खेपेला येताल तवा काहीतरी करीन. पार आताच्याला राग धरू नागासा मना मंदी जावाई समजदार होता. धुर्पाचा तो म्हणाला
"मामी काळजी करू नागासा आधी कर्ज फेडा. मंग चांगल तोळाभर सोन घेणार हाय तुमच्या कडून".
कमळी आईच्या गळ्याला पडून ढस ढसा रडली... आज घरात २२ पोते गहू आला... नव्या धान्याची पूजा झाली.. २२ पोत्यातल २ पोते गहू घरी ठेवलं २० पोत्याचे ५० हजार रुपये आले.. आता धुर्पानी राजूच्या बायकोला परत बोलावलं.. राजूच्या बायकोनी तिला ५० हजारच नियोजन नीट करून दिलं.. सावकाराचे व्याज ५ हजार ब्यांके चे २५ हजार आणि व्याज ६ असे मिळून ३१ हजार, आणि वीज बिलाचे ४ हजार, परत पिक घेण्यासाठी १० हजार खर्च, सगळंच नियोजन करून राजूची बायको धुर्पा बरोबर पैसे भरण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गेली…परत धुर्पाच्या हातात एकही पैसा शिल्लक राहिला नाही.. पण तिने आता शेताची कागद्पत्र तरी परत मिळवली होति.. कामाच्या घरातून आधीच उचल घेतल्यामुळे आता धुर्पाच्या हातात पैसे नव्हते.. ३ पोरांची पोटं भरायची कशी? तिने एका बान्ध कामाच्या जागी विटा उचलायच काम परत सुरु केलं.. तिथे मिळणारा ५० रुपये रोज आणि कामावर मिळणारे उरले सुरले यावर धुर्पानी नेटानी संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली.. आता रब्बीच्या हंगामात ज्वारीच पिक घ्यायचा निर्णय धुर्पानी घेतला... रब्बी हंगामात ज्वारीच पिक पण तरारूनआल.... ज्वारी पण भरपूर झाली... ज्वारीचे पण २५ पोते झाले आता धुर्पाकडे परत ५० हजारांपर्यंत रक्कम गोळां झाली.. आता सावकाराचे २० हजार मुद्दल देऊन २० हजार त्याच व्याज दिल, आणि त्याच्याकडचे दागिने सोडवून आणले.. आता धुर्पाचे कामावरचे पण पैसे येऊ लागले.. तोपर्यंत सोनारानी पैस्यांसाठी तगडा लावला होता.. त्याचे ४० हजाराचे वर्ष्याचे १४४०० नुसते व्याजच झाले होते.. धुर्पा परत एकदा खचली.. अखेरीस तिने बांगड्या मोडीत घालायचे ठरवले.. शिर्पानी तीला मोठ्या हौसेनी केल्या होत्या बांगड्या, पण आता पर्यायच शिल्लक नव्हता.. अखेर धुर्पानी बांगड्या मोडल्या, आणि सोनाराच देण फेडून गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणले.. आता धुर्पा कर्ज मुक्त झाली खरी, पण आजूनही कमळीला बोलावून तिला तिच्या पोराला, आणि तिच्या नवर्याला काहीतरी करण्याची खंत बाकी होती.. धुर्पानी पुढच्या हंगामात पैसे आले कि कमळीला परत बोलावलं.. तिच्या पोराचा पाचवा वाढदिवस जोरात करायचं ठरवलं.. धुर्पा नि नातवाला आणि जावयाला दोघांना पण अंगठी केली.. थाटात वाढदिवस साजरा झाला.. आज धुर्पा शिर्पाच्या फोटो समोरउभी राहिली.. मागच्या ५ वर्ष्याचा काळ तिच्या डोळ्यासमोरून सरकला.. एक एक दिवस कसा काढला ते तिला आठवत होतं.. डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले... ह्या सगळ्यात शिर्पाची साथ तिला मिळाली असती तर संसार किती सुखाचा झाला असता.. याचा विचार करत ती मनाशीच पुटपुटली
"धनी इतक कठीण व्हत का वआयुक्ष..?? आमी जगलोच कि तुमच्या मागं... तुमी एकदा तर मनायचं "
''धुर्पा मला तुझी साथ पाह्यजे ग कष्टाला"
'' हसत हसत कष्ट केले असते धनी तुमच्या साठी... पर अस एकटीला टाकूनकशापाई गेलासा ????"

कीर्ती कुलकर्णी
kirti.kulkarni888@gmail.com

Share

प्रतिक्रिया