नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुबार पेरणी
तुझी झलक पाहूनी
पावसा खेळलो मी जुगार
बीज कोमीजली आता
नको घेवुस माघार
खेळ पाहूनी तुझा रे
खेळ माझा बिघडला
असं वाटते मनाला
डोळा तिसरा उघडला
आग पाहूनी रवीची
मन माझं होळपलं
तुझ्या जाण्यानं पावसा
उभं पीकं करपलं
काळी माय माझी मेघा
वाट तुझी पाही
लेकरू आहे रे दु:खात
थोडी करणारे तु घाई
बरस असा तू पावसा
शांत करणा रे धरणी
नकोसं झालं जीणं
नको दुबार पेरणी
नको दुबार पेरणी
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने