नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पावसाचे गाणे
थेंब का ते पावसाचे,गोठले आता,
पांढरे का मेघ गगनी,साठले आता......
रान सारे रापलेले,मागते पाणी,
अंत डोळे कोरडे मी,ढाळले आता......
हंबरावे वासराने रातदिन किती?
परत पान्हा शोधताना,हिंडले आता....
कोंभ येता का अश्रुचे पाट धरले मी,
पावसाची वाट पाहत,वाळले आता.....
संचिताचे खेळ सारे खेळतो बाप्पा ,
पावसाने कृषकाशी,खेळले आता....
पावसाचे गात गाणे जीव हसला तर,
मन नभाचे पावसाळी दाटले आता
............शीतल सुर्यवंशी
(सध्या गझल लिहिण्यास ....शिकण्याचा पर्यत्न चालला आहे.त्यातली हि माझी पहिली गझल(राधा वृत्त)
प्रतिक्रिया
छान प्रयत्न.
छान प्रयत्न.
शेतकरी तितुका एक एक!
पाने